मानखुर्दमध्ये Abu Azmi यांचा प्रचार उबाठाचे शिवसैनिक करणार

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला २ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यात मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व जागेचा समावेश आहे.

625
विधिमंडळ असो अथवा सार्वजनिक ठिकाणी अशा प्रत्येक ठिकाणी कायम हिंदुद्वेषी वक्तव्ये करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांना उबाठाने पाठिंबा दिला आहे. उबाठाचे शिवसैनिक हे आझमी यांचा मानखुर्द येथे निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. त्यामुळे उबाठावर जो हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला जातो, तो आरोप यामुळे अधोरेखित झाला आहे.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीकडून समाजवादी पक्षाला २ जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यात मानखुर्द शिवाजीनगर, भिवंडी पूर्व जागेचा समावेश आहे. मानखुर्द शिवाजीनगर भागात समाजवादी पक्षाने त्यांचे प्रदेशाध्यक्ष अबु आझमी यांना उमेदवारी दिली आहे. अबू आझमी (Abu Azmi) मानखुर्द शिवाजीनगर भागात प्रचार करत आहेत. मंगळवारी अबु आझमी यांनी मानखुर्दच्या PMGP कॉलनीतील उबाठाच्या शाखेला भेट दिली. यावेळी आझमींनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचाराबाबत चर्चा केली. आम्ही एकत्रित मिळून संविधान वाचवायचे आहे आणि भाईचारा पुढे न्यायचा आहे, जय महाराष्ट्र अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

अबू आझमी (Abu Azmi) यांनी यापूर्वी केलेली हिंदुद्वेषी, धर्मांध वक्तव्ये

  • अबू आझमी (Abu Azmi) यांनी विधानसभेत ‘वंदे मातरम म्हणण्यास विरोध केला, त्यावेळी म्हणाले होते की, त्यांचा धर्म त्यांना कोणासमोर झुकण्याची परवानगी देत ​​नाही. त्यामुळे आपण वंदे मातरम म्हणू शकत नाही. ते म्हणाले की, आम्ही आमच्या आईसमोरही डोके टेकवत नाही, आम्ही फक्त अल्लाहसमोर डोके टेकवतो.
  • अहमदनगरमधील कर्जतमध्ये एका कार्यक्रमात बोलताना आझमी म्हणाले होते की, औरंगजेब हा वाईट राजा नव्हता, त्याचा इतिहास समोर आणला तर त्याला सर्वजण चांगले म्हणतील.
  • अबू आझमींनी CAA आणि NRC कायद्यावरुन मोदींवर टोकाची टीका केली होती. आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचे सर्टिफिकेट आणावे. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचे सर्टिफिकेट दाखवावे.
  • अबू आझमी (Abu Azmi) यांचा मुलगा फरहान आझमी म्हणाले की, जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये राम मंदिर बांधणार असतील तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार.
  • महिला जेवढी नग्न, तेवढे तिला फॅशनेबल समजले जाते, माझी बहिण किंवा मुलगी रात्रीचे अनोळखी पुरुषासोबत बाहेर पडते आणि त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसेल. तर हे बरोबर नाही. पेट्रोल असेल तिथे आग भडकणारच आणि साखर असले, तिथे मुंग्या येणारच.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.