मतदारसंघातील वातावरण पूरक होईल असा प्रयत्न केला जाईल; Sunil Tatkare यांचे स्पष्टीकरण

79
मतदारसंघातील वातावरण पूरक होईल असा प्रयत्न केला जाईल; Sunil Tatkare यांचे स्पष्टीकरण
  • प्रतिनिधी

काही अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. त्यामुळे जे-जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युद्धपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या-त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पद्धतीने पूरक होईल असा प्रयत्न नक्कीच केला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

आमच्यामध्ये फारशी जागांची संख्या नसून ९० ते ९५ टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार म्हणून उत्तम पध्दतीने काम सुरू झाले आहे. त्यामुळे आजच महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संध्याकाळी होणार आहे. त्यामुळे २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने, आणि संपूर्ण शक्तीने एकत्रित निवडणूक लढत आहोत. अन्य ठिकाणी अपक्ष उमेदवार हे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील तर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करत असून एक-दोन दिवसांत नाराजांची समजूत काढण्यात नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वासही खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी व्यक्त केला.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : अमरावती जिल्ह्यात आठ मतदारसंघात १६० उमेदवार रिंगणात)

शरद पवार यांच्या कुठल्याच वक्तव्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतानाच बारामतीची जनता सूज्ञ आहे. ३० वर्षात अजित पवारांनी बारामतीत उभे केलेले प्रचंड काम बारामतीकर नव्हे तर पूणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र विसरू शकत नाही किंवा अनुभवत असून देशभर बारामती पॅटर्नचे कौतुक होत असते. त्यामधील अजित पवारांचा जो सहभाग आहे तो सुज्ञ बारामतीकर ठरवतील की, कुणाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी देऊ. मात्र या विधानसभेत प्रचंड फरकाने अजित पवार हेच निवडून येतील असा ठाम दावाही खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी केला.

राज ठाकरे कधी-कधी त्यांच्या पध्दतीने बोलत असतात. कधी ते विनोद करतात तर कधी मिमिक्री करतात त्यामुळे त्यांचे बोलणे त्याच अर्थाने घ्यावे. त्यापेक्षा काही वेगळे असेल असे मला वाटत नाही असे सांगत, कॉंग्रेसला लोकसभेला मिळालेले यश कुठल्या पद्धतीने डोक्यात गेलेले आहे आणि ते किती जमिनीवर यायला लागले आहे याचे चित्र म्हणजे कोल्हापूरमध्ये सोमवारी कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज माघारी घेतला असा खोचक टोलाही खा. तटकरे (Sunil Tatkare) यांनी लगावला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.