कराड उत्तर (Karad North) विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवादी शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपाचे मनोज घोरपडे असा सामना पाहायला मिळत आहे. यशवंत विचाराचा मतदारसंघ असलेल्या कराड उत्तर मतदार संघात संस्थात्मक राजकारण आणि शरद पवारांची साथ यामुळे बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत ५ वेळा कराड उत्तरचे आमदार राहिले.
(हेही वाचा Wai मध्ये तिरंगी लढत; महायुतीतील बंडखोरीचा मकरंद पाटलांना बसणार फटका?)
मात्र, यंदाची निवडणूक बाळासाहेब पाटील यांच्यासाठी नक्कीच सोप्पी नाही. या ठिकाणी ‘मनो”धैर्य’ एकवटल्याने बाळासाहेबांना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागत आहे. मतदारांची नाराजी असणे आणि मतदारसंघात भाजपाचे तयार झालेले वातावरण यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार असे दिसत आहे. या गोष्टीमुळे बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी यंदा मोठा संघर्ष करावा लागेल हे मात्र नक्की.
Join Our WhatsApp Community