Jalgaon जिल्ह्यात ‘मविआ’ची अस्तित्वाची लढाई!

97
Jalgaon जिल्ह्यात ‘मविआ’ची अस्तित्वाची लढाई!
  • खास प्रतिनिधी 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक आणि महायुती सरकारचे संकटमोचक अशी ओळख असलेले जळगावचे गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठीराखे गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व ११ जागा जिंकण्याचे आव्हान आहे तर ना भाजपा, ना राष्ट्रवादी काँग्रेस (शप) असे अधांतरी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यावर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असून महाविकास आघाडीकडे एकही जागा नाही.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ११ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगांव, पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर यांचा समावेश आहे. (Jalgaon)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : माहीममध्ये गुरु शिष्यामध्येच लढाई)

सातव्यांदा निवडून येण्यासाठी सज्ज

गिरीश महाजन हे जामनेर मतदारसंघातून सातव्यांदा निवडून येण्यासाठी सज्ज झाले आहेत. महाविकास आघाडीकडे महाजन यांच्यासमोर उमेदवार नव्हता. अखेर भाजपाचेच एकेकाळचे पदाधिकारी दिलीप खोडपे यांना शरद पवार यांनी आपल्या पक्षात घेऊन तिकीट दिले. मात्र महाजन यांनी गेल्या ३० वर्षात बांधलेल्या या मतदार संघात त्यांना मूळचे भाजपाचे उमेदवार किती टक्कर देतील, हा प्रश्नच आहे. (Jalgaon)

आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने

जळगाव ग्रामीण भागात दोन गुलांबरावांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. २०१४ नंतर २०२४ मध्ये दोन्ही गुलाबराव म्हणजेच विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री राष्ट्रवादी (शप) उमेदवार गुलाबराव देवकर जळगाव ग्रामीण या मतदारसंघात आमने-सामने आले आहेत. २००९ मध्येही दोघे एकमेकांसमोर आले असता पाटील यांचा पराभव झाला तर २०१४ ला पाटील त्यांच्यासमोर जिंकले. २०१९ मध्ये देवकर निवडणूक रिंगणात नव्हते. त्यामुळे १० वर्षानंतर दोघे पुन्हा आमने-सामने आले आहेत. (Jalgaon)

(हेही वाचा – Karad North मतदारसंघात भाजपाचे मविआला मोठे आव्हान)

खडसेंची प्रतिष्ठा पणाला

उत्तर महाराष्ट्रातील एकेकाळचे भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंघ) प्रवेश केला. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आणि त्यांनी भाजपासोबत येण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश जवळपास निश्चित झाला. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी त्यांची सून आणि भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करून निवडून आणण्यास मदत केली. मात्र राज्यातील भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा भाजपा प्रवेश लांबला तो अद्याप प्रतिक्षेतच आहे. लोकसभेनंतर त्यांनी पुन्हा विचार बदलला आणि राष्ट्रवादी (शप) सोबत राहण्याचा निर्णय घेतला. आता त्यांची कन्या रोहिणी खडसे या मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी (शप) गटाच्या उमेदवार असून त्यांची लढत शिवसेना (शिंदे) चंद्रकांत पाटील यांच्याशी होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रोहिणी खडसे यांचा पराभव केला होता. (Jalgaon)

सेना वगळता सगळ्या पक्षात बंड

शिवसेना (शिंदे) वगळता सर्वच पक्षांमध्ये काँग्रेस, भाजपा, उबाठा, राष्ट्रवादी (शप) पक्षांमध्ये बंडखोरी झाली असून ११ मतदारसंघात ९२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर १३९ उमेदवार या जिल्ह्यातून निवडणूक रिंगणात आहेत. (Jalgaon)

मित्रांमध्ये लढत

चाळीसगांव मतदारसंघात दोन मित्रांमध्ये लढत होणार असून भाजपा आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध माजी खासदार उबाठाचे उमेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत. पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने उबाठात प्रवेश केला. महाविकास आघाडीत उबाठा आणि राष्ट्रवादी (शप) या मतदारसंघावरून खूप रस्सीखेच झाली अखेर उबठाने ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेतली. (Jalgaon)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.