गुजरातमधील आणंदमध्ये बुलेट ट्रेनसाठी (Bullet Train) बांधण्यात येत असलेला पूल कोसळला आहे. पुलाच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आणंद जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जी. जी. जसानी यांनी सांगितले की, वसदजवळ बुलेट ट्रेनचा (Bullet Train) प्रकल्प सुरू होता, त्यामध्ये लोखंडी जाळी पडल्याने तीन ते चार मजूर गाडले गेल्याची माहिती मिळाली. दोन मजुरांचा मृत्यू झाला, तर एक मजूर बचावला आहे. अजूनही एक मजूर अडकल्याची शक्यता असून बचावकार्य सुरू आहे.
Tragic incident in Gujarat: Concrete blocks collapsed at the Bullet Train project site in Anand today. Rescue operations are ongoing as police and fire brigade officials work tirelessly. National High Speed Rail Corporation Limited reports three workers trapped — one rescued… pic.twitter.com/b6gMje3zBL
— Sanghamitra Bandyopadhyay (@SanghamitraLIVE) November 5, 2024
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Bullet Train) कॉरिडॉरसाठी गुजरातमध्ये एकूण 20 ठिकाणी नदीवर पुलांचे बांधकाम सुरु आहे. त्यापैकी 12 पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ही माहिती देताना नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उच्चाधाकिऱ्यांनी सांगितले की, गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील खरेरा नदीवरील 120 मीटर लांबीचा पूल नुकताच पूर्ण झाला आहे.
पंतप्रधान मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
बुलेट ट्रेन (Bullet Train) हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर (Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor) एकूण 508 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पात गुजरातमधील 352 किलो मीटर आणि महाराष्ट्रातील 156 किलो मीटरचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, अहमदाबाद, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद आणि साबरमती अशी एकूण 12 स्थानकांवर बुलेट ट्रेनचा थांबा असणार आहे. 508 किलोमीटर लांबीचे हे अंतर हायस्पिड ट्रेनने दोन तास सात मिनिटांत कापले जाणार आहे. रेल्वेने हे अंतर कापण्यासाठी साडे सहा तास लागतात. तर विमानाने सव्वा तास लागतो.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community