Maharashtra Assembly Election 2024 : अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा बरळले; हिंदूंवरच हिंदू आणि मुस्लिम वाद वाढवण्याचा ठपका

109
Maharashtra Assembly Election 2024 : अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा बरळले; हिंदूंवरच हिंदू आणि मुस्लिम वाद वाढवण्याचा ठपका
Maharashtra Assembly Election 2024 : अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा बरळले; हिंदूंवरच हिंदू आणि मुस्लिम वाद वाढवण्याचा ठपका

मी मुस्लिम असून मला गर्व आहे मुस्लिम असल्याचा, आणि मला अभिमान आहे मी हिंदुस्थानी आहे. मी मुस्लिम असलो, तरीही आम्ही ब्राह्मण समाजालादेखील पुढे आणू. मी चिथावणीखोर भाषण करतो, असे सांगितले जाते; पण आमच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नसतात, मग माझ्या भाषणांना चिथावणीखोर ठरवले जाते. योगी म्हणतात, बटेंगे तो कटेंगे. बीफ, घरवापसी नावावर तुम्ही जे कापत आहे, त्यामुळे देश कमजोर होत नाही का ? हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद लावून तुम्ही देशाला कमजोर करत नाही का ?, असा प्रश्न करत तेलंगाणाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी हिंदूंवरच हिंदू-मुस्लिम वादाचा ठपका ठेवला. ते मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगरमधील (Sambhajinagar) प्रचारसभेत बोलत होते. यापूर्वी पोलिसांना १५ मिनिटांसाठी बाजूला केल्यास हिंदूंना संपवण्याची चिथावणीखोर वक्तव्ये केल्याने अकबरूद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) चर्चेत आले होते. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकर यांना भाजपचा जाहीर पाठिंबा; म्हणाले, इंजिनला मतदान करा!)

या वेळीही संभाजीनगरमधील सभेत त्यांनी हिंदू-मुसलमान मुद्द्यावरच राजकारण केले. अकबरूद्दीन ओवैसी पुढे बोलतांना म्हणाले, “भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी केले. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्व शिकवण्यात यशस्वी झाले का? राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना धर्मनिरपेक्षता शिकवण्यात यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का? यांना फक्त सत्ता आणि सत्तेची गादी पाहिजे.”

आमचे 10 आमदार आल्यावर ना ठाकरे, ना शिंदे, ना पवार, कुणीच सत्तेवर बसू शकत नाही, असेही अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.