अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणीतून निकाल समोर येऊ लागले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आघाडीवर आहेत. आतापर्यंत १५ राज्यांमध्ये ट्रम्प यांचा विजय आणि ६ राज्यांत आघाडी, तर कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा ९ राज्यात विजय आणि ७ राज्यांत आघाडी आहे. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (US Presidential Election)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : अकबरुद्दीन ओवैसी पुन्हा बरळले; हिंदूंवरच हिंदू आणि मुस्लिम वाद वाढवण्याचा ठपका)
आतापर्यंत डोनल्ड ट्रम्प यांनी इंडियाना, केंटकी, साऊथ कॅरोलिना, फ्लोरिडा, अलाबामा, मिसुरी, ओक्लाहोमा, टेनेसी, इलिनॉय, मिसिसिपी, टेक्सस, अरकान्सा, नेब्रास्का, नॉर्थ डेकोटा, साऊथ डेकोटा, ल्युसियाना, व्योमिंग, कॅन्सास, ओहायो, नॉर्थ कॅरोलिना, जॉर्जिया या राज्यांत मताधिक्य घेतले आहे. तर कमला हॅरीस यांनी वरमाँट, न्यूयॉर्क, पेनसिल्विनिया, डेलावेअर, कोलोरॅडो, मिशिगन, विसकॉन्सिन, न्यू हॅम्पशिअर या राज्यांत विजय मिळवला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळत आहे. आधी जो बायडेन यांच्याशी ट्रम्प यांचा थेट सामना होणार होता; पण ऐनवेळी बायडेन यांच्या माघारीमुळे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community