Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?

69
Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?
Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा (Ajit Pawar Manifesto) आज (६ नोव्हें.) प्रसिद्ध करण्यात आला आहे. अजित पवार गट आपला वेगळा जाहीरनामा (Ajit Pawar Manifesto) प्रसिद्ध करणार आहेत. इतकेच नाही तर राज्यातील 50 विधानसभा मतदारसंघासाठी 50 जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशी कल्पना पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच अंमलात आणली गेली आहे. (Ajit Pawar Manifesto)

(हेही वाचा-‘भारत जोडो’च्या माध्यमातून अर्बन नक्षलवाद; Devendra Fadnavis यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार)

जाहीरनामा (Ajit Pawar Manifesto) प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे.

(हेही वाचा-Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?)

तालुका स्तरीय देखील जाहीरनामा (Ajit Pawar Manifesto) प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती तटकरे यांनी दिली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरनाम्यावर भाष्य केलं.

जाहीरनाम्यात काय ? (Ajit Pawar Manifesto)

लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना दीड हजर नाही तर तबल 2100 रुपये देण्यात येणार.

सोबत महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करणार.

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजर रुपये देणार.

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा.

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या msp वर 20%अनुदान देणार.

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देणार.

वृद्ध पेन्शन धारकांना आता पंधराशे वरुण महिन्याला 2100 रुपये देणार.

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतन.

25 लाख रोजगार निर्मिती.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.