अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US Election Results) डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्यात अटी-तटीचा सामना सुरु होता. आता, अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा एकदा अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं आहे. (US Election Results)
(हेही वाचा-Ajit Pawar Manifesto: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध; काय आहे वेगळेपण?)
डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवला आहे. फॉक्स न्यूजनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. त्याचवेळी कमला हॅरिस यांना केवळ २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांना संबोधित करायला पोहोचले. यावेळी ट्रम्प यांनी विजयाचा आनंद असल्याचं सांगितलं, तसेच त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प म्हणाले. (US Election Results)
(हेही वाचा-Nilesh Rane : मागून आलेले मंत्री झाले, मी अजून किती दाढी पिकवायची? निलेश राणेंच्या मनात नेमकं काय?)
पुढची 4 वर्ष अमेरिकेसाठी सुवर्णकाळ असेल. आपण इतिहास घडवला आहे. या प्रकारचा राजकीय विजय कधीही पाहिलेला नाही. तुमच्यासाठी लढत राहणार. असेही ट्रम्प यांनी अधोरेखित केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जेडी वान्स यांनीही रिपब्लिकन पक्षाच्या मतदारांना संबोधित केले. जेडी वन्स म्हणाले, ‘हे अमेरिकन इतिहासातील सर्वात मोठे राजकीय पुनरागमन आहे. मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे. अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे राजकीय पुनरागमन आहे’. जेडी वान्स यांनीही त्यांच्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. (US Election Results)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community