Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप

148
Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप
Uttarakhand मधील अपघातग्रस्तांची मोहम्मद आमिरने फेसबुकवर उडवली खिल्ली; हिंदूंकडून संताप

उत्तराखंडच्या (Uttarakhand) अल्मोरामध्ये दि. ४ नोव्हेंबर २०२४ रोजी ४५ प्रवाशांसह जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात ३९ प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर मृत प्रवाशांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. त्यामुळे मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मदने या अपघाताबद्दल आक्षपार्ह पोस्ट केली होती. ज्याप्रकरणी दि. ५ नोव्हेंबर मोहम्मद आमिर (Mohammad Amir) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Uttarakhand)

( हेही वाचा : US Election Results: २७७ बहुमताचा आकडा गाठत Donald Trump ठरले अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष

पौंडी गढवालच्या धुनाकोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीत म्हंटले आहे की, अपघातात मृत्यू झालेले लोक आमच्या परिवारातील आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुखाचे वातावरण आहे. मात्र मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राद्वारे अपघातावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला आहे. यात अपघातातील मृतांच्या छायाचित्राचा ही उपयोग करण्यात आला आहे. (Uttarakhand)

पोस्टमध्ये मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) दुर्घटनेच्या छायाचित्रावर ‘ होम डिलिव्हरी’चे पोस्टर लावत, ‘शुभ दीपावली’ असे ही लिहण्यात आले आहे. ही पोस्ट मोहम्मदने फेसबुक स्टोरीवर टाकली होता. त्यानंतर हा स्टेटस व्हायरल झाले. लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. त्यामुळे तक्रारकर्त्याने सांगितेल की, आरोपीला कठोर शिक्षा झाली नाही तर हिंदू समाज मोहम्मद आमिर (Mohammad Amir) याच्याशी स्वत: लढेल. त्यानंतर पोलिसांनी मोहम्मद आमिरला (Mohammad Amir) अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. (Uttarakhand)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.