अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बाजी मारली. तसेच डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव झाला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) दुसऱ्यांदा राष्ट्रध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
( हेही वाचा : Raj Thackeray: “शरद पवार तालुक्याचे नेते”, राज ठाकरेंनी साधला निशाणा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सवर संदेश लिहत म्हणाले, ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्रा, तुझे मनापासून अभिनंदन. मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी करून मजबूत राष्ट्र उभारणीसाठी आम्ही उत्सुक आहोत, अशा आशयाची पोस्ट ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी केली आहे.
तसेच आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, असेही आवाहन ही ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयानंतर मोदींनी दि. ५ नोव्हेंबर रोजी केले आहे. ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community