Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील शेतीला दुष्काळाच्या झळा; नेत्यांची संपत्ती मात्र कोट्यवधींच्या घरात

33
Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील शेतीला दुष्काळाच्या झळा; नेत्यांची संपत्ती मात्र कोट्यवधींच्या घरात
Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील शेतीला दुष्काळाच्या झळा; नेत्यांची संपत्ती मात्र कोट्यवधींच्या घरात

मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये प्रमुख उमेदवारांनी आपला मुख्य व्यवसाय शेती असल्याचे दाखवले आहे. या सर्व उमेदवारांची संपत्ती कोटींमध्ये आहे. एकीकडे मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी दुष्काळाने होरपळलेला असतांना या नेत्यांनी शेतीतून एवढे उत्पन्न कसे मिळवले, हा चर्चेचा विषय झाला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

शेतमालाचे घसरलेले दर, दुष्काळ, गारपीट यांमुळे मराठवाडा आणि अमरावती विभागात गेल्या २४ वर्षांत तब्बल ३० हजार ७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेती जर फायद्याची असती, तर एवढ्या आत्महत्या झाल्या असत्या का ? करमुक्त उत्पन्न दाखविण्यासाठी बाजार समितीमधून पावत्या मिळवून फसवाफसवी केली जात असल्याचा आरोप या विषयाचे अभ्यासक शहाजी नरवडे यांनी केला आहे.

(हेही वाचा – Donald Trump यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा एक्सवर संदेश; म्हणाले, मित्रा…)

कोणत्या नेत्याचे उत्पन्न किती रुपये ?
  • कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी २०२३-२४ मध्ये आयकर विभागाकडे ६९ लाख ८८ हजार ७८० रुपयांचे उत्पन्न दर्शविले आहे.
  • माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेती, व्यापार, आमदारांचे मानधन, भाडे या उत्पन्नातून मिळविलेल्या संपत्तीचे बाजारमूल्य, त्यांची संपत्ती ६ कोटी ८५ लाख २७ हजार ६०१ रुपयांची असल्याचे नमूद केले आहे.
  • अनेक कंपन्यांमध्ये भागीदारी आणि समभाग असणारे काँग्रेसचे नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनीही आपला उत्पन्नस्रोत शेती असल्याचे लिहिले आहे.
  • राजेश टोपे, राणा जगजितसिंह पाटील यांचे उत्पन्नही शेतीतूनच आहे.
  • खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी मद्यविक्रीचा व्यवसाय असल्याचे नमूद केलेले आहे.
  • संजय शिरसाट यांनी आपण ‘विकासक’ असल्याचे लिहिले आहे.
किती शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या ?

मराठवाडा

● २००१ ते २०२४ या काळात ११,५१८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

● ८४४० शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाची मदत

● यंदा सप्टेंबरपर्यंत ६६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती विभाग

● २००१ ते २०२४ या काळात २०,७७२ शेतकरी आत्महत्या केल्या.

● यंदा जानेवारी ते ऑगस्टदरम्यान ६९८ आत्महत्या (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.