savitribai phule pune university ही खरोखरंच आहे का जगात भारी?

115
savitribai phule pune university ही खरोखरंच आहे का जगात भारी?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजेच SPPU हे पुणे शहरामध्ये असलेलं एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची स्थापना १९४९ साली करण्यात आली होती. हे विद्यापीठ गणेशखिंडच्या शेजारी असलेल्या ४११ एकर क्षेत्रफळाच्या कॅम्पसमध्ये विस्तारलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ शैक्षणिक विभाग आहेत. त्यांमध्ये सुमारे ३०७ मान्यताप्राप्त संशोधन संस्था आणि संलग्न असलेली ६१२ महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकवला जातो. (savitribai phule pune university)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०२२ सालच्या NIRF रँकिंगमध्ये १२वं स्थान मिळवलं होतं. तसंच २०२३ सालच्या टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगातल्या ६०१ ते ८०० बँड तसेच आशियामधल्या २०१ ते २५० बँडमध्ये उदयोन्मुख विद्यापीठांच्या क्रमवारीत स्थान मिळालं होतं. तर २०२४ साली नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF द्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातल्या विद्यापीठांमध्ये ३७व्या क्रमांकावर होतं. (savitribai phule pune university)

(हेही वाचा – golden temple : का आहे सुवर्ण मंदिर इतकं प्रसिद्ध?)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इतिहास

या विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ साली करण्यात आली. एम. आर. जयकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. या विद्यापीठाचं पहिलं कार्यालय हे लॉ कॉलेज रोडवरच्या भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटचा भाग असलेल्या निजाम गेस्ट हाऊसपासून सुरू झालं होतं. हे विद्यापीठाचा कारभार १ जून १९४९ सालापर्यंत निजाम गेस्ट हाऊस इथून चालवला जात होता. त्या काळी बी.जी.खेर मुख्यमंत्री आणि मुंबई सरकारच्या शिक्षण मंत्र्यांनी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॅम्पससाठी ४११ एकर जागा मिळवून दिली होती. (savitribai phule pune university)

महिलांना शिक्षण मिळावं यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचं नाव ९ ऑगस्ट २०१४ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं ठेवण्यात आलं. सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी १८४८ साली मुलींसाठी भारतातली पहिली स्थानिक शाळा सुरू केली होती. (savitribai phule pune university)

(हेही वाचा – Donald Trump यांच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचा एक्सवर संदेश; म्हणाले, मित्रा…)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभाग

या विद्यापीठात विज्ञान, समाजशास्त्र, व्यवस्थापन, कायदा इत्यादी विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध असणारे वेगवेगळे विभाग आणि केंद्रे आहेत. तसंच इथे असलेल्या इंजिनिअरिंग विभागात कम्प्युटर इंजिनिअरिंग, एआय आणि डेटा सायन्स, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग अशाप्रकारचे बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. (savitribai phule pune university)

याव्यतिरिक्त इथे २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून पर्यावरण शास्त्राचा पदवी अभ्यासक्रमही सुरू केला आहे. तसंच रानडे इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये १९४९ साली परदेशी भाषा विभाग सुरू करण्यात आला होता. या विभागात जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी आणि स्पॅनिश इत्यादी भाषांचे प्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दरवर्षी १५०० पेक्षा जास्त विद्यार्थी या विभागात ऍडमिशन घेतात. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण घेण्याकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राचा मोलाचा वाटा असतो. (savitribai phule pune university)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.