sindhudurg fort : काय आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये?

67
sindhudurg fort : काय आहेत सिंधुदुर्ग किल्ल्याची वैशिष्ट्ये?

सिंधुदुर्ग हा किल्ला (sindhudurg fort) महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा एक जलदुर्ग आहे. २५ नोव्हेंबर १६६४ साली या किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात केली होती. २१ जून २०१० साली भारत सरकारने या जलदुर्गाला महाराष्ट्रातलं राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे.

सिंधुदुर्गाचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारचे आद्यस्थान म्हणजे मालवण इथला जंजिरा म्हणजेच हा सिंधुदुर्ग किल्ला (sindhudurg fort) होय. महाराजांकडे एकूण ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्व दिशेला विजापूर, दक्षिण दिशेला हुबळी, पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि उत्तर दिशेला खानदेश-वऱ्हाड यांचा विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीनेच सागरी मार्गावरुन येणारी शत्रूंची आक्रमणे परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे. हे महाराजांनी ओळखलं आणि जलदुर्गांची निर्मिती केली.

(हेही वाचा – savitribai phule pune university ही खरोखरंच आहे का जगात भारी?)

सिंधुदुर्ग (sindhudurg fort) बांधण्यासाठी समुद्रकिनाऱ्याची व्यवस्थित पाहणी करण्यात आली. १६६४ साली मालवणच्या जवळचं कुरटे नावाचं काळ्या खडकाचं बेट किल्ला बांधण्यासाठी निवडण्यात आलं. महाराजांच्या हस्ते या किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. किल्ल्याच्या पायाभरणीची जागा ‘मोरयाचा दगड’ म्हणून प्रसिद्ध आहे. त्यावेळी या बेटावर एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली होती.

त्या काळी सिंधुदुर्ग हा किल्ला (sindhudurg fort) बांधण्यासाठी एक कोटी होन एवढा खर्च आला होता. या किल्ल्याच्या उभारणीसाठी तीन वर्षं लागली होती. सिंधुदुर्ग बांधण्यासाठी चार कोळी बांधवांनी योग्य स्थळ शोधलं. त्या कोळी बांधवांना महाराजांनी गावं इनाम म्हणून दिली. नैसर्गिक सौंदर्याने सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे बेटावर गेली तीन शतके उभा आहे, ते बेट मालवण पासून सुमारे अर्धा मैल एवढ्या अंतरावर समुद्रामध्ये आहे. या बेटाचं क्षेत्रफळ सुमारे ४८ एकर इतकं आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटाची लांबी सुमारे २ मैल एवढी आहे. तसंच किल्ल्याच्या तटाची उंची सुमारे ३० फूट, तर रूंदी १२ फूट एवढी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटाला ठिकठिकाणी भक्कम असे एकूण २२ बुरुज आहेत. या बुरुजांभोवती धारदार खडक आहेत.

सिंधुदुर्गाच्या पश्चिम आणि दक्षिण दिशांना अथांग समुद्र पसरलेला आहे. किल्ल्याच्या (sindhudurg fort) पश्चिम आणि दक्षिणेकडच्या तटाच्या पायांत सुमारे ५०० खंडी शिसे ओतले आहे. या तटाच्या बांधणीसाठी ८० हजार होन एवढा खर्च आला होता. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या उजव्या हाताचे आणि डाव्या पायाचे ठसे उमटलेले आहेत.

(हेही वाचा – Vijay Wadettiwar यांनी मतदारांना केली शिवीगाळ; व्हिडिओ पोस्ट करत भाजपाचा आक्रमक पवित्रा)

सिंधुदुर्ग किल्ल्याचं महत्त्व

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याला (sindhudurg fort) फार महत्त्व होतं. किल्ल्याचं क्षेत्रफळ ४८ एकर एवढ्या जमिनीवर पसरलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतींमध्ये त्या काळी तीस ते चाळीस शौचालयांची सोय केली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज शंकराच्या रूपात असलेलं एक मंदिर आहे. हे मंदिर १६९५ छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलं होतं.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर पाण्याची सोय

या किल्ल्याच्या (sindhudurg fort) परिसरात दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव नावाच्या गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. ह्या विहिरींचं पाणी खूप गोड लागतं. किल्ल्याच्या बाहेर खारट पाणी आणि आत गोड पाणी हा निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी किल्ल्यावर एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या या तलावातल्या पाण्याचा वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी केला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.