Raj Thackeray : आपले भाऊ मेलेत काय? मुख्यमंत्री आपली बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका

215
Raj Thackeray : आपले भाऊ मेलेत काय? मुख्यमंत्री आपली बहीण योजनेवर राज ठाकरेंची टीका
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीत काही जागांवर महायुतीने मनसेला पाठिंबा दिलेला असतानाच दुसरीकडे मनसेकडून राज्यातील महायुती सरकारवरच टिकेची झोड उडवताना दिसत आहे. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तीव्र शब्दांत टीका करतानाच बहिणीला पैसे देण्यासाठी कर्ज काढायचे. यासाठी सर्वांचे भाव वाढवायचे आणि दिलेल्या पेक्षा दुप्पट घ्यायचे असाच प्रकार सुरु असून लाडक्या बहिणींसाठी योजना, मग लाडका भाऊ मेलाय का असा सवाल करत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी असल्या लोकांच्या नादी लागू नका, मनसेला एकदा संधी द्या असे सांगितले.

(हेही वाचा – “विधानसभेत जाण्या अगोदर त्याचे पाय…”; Narayan Rane यांचा AIMIM ला कडक इशारा)

पंढरपूरमधील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवरच टीका करतानाच या निवडणुकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सहकाऱ्यांना एकदा साथ द्या, मनसेला संधी द्या असे आवाहन मनसेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – India, Qatar Alliance : मनी लाँडरिंग रोखण्यासाठी भारत व कतार येणार एकत्र)

कर्ज काढून बहिणींना पैसे द्यायचे आणि सर्व वस्तूंचे भाव वाढवायचे आणि दिले त्यापेक्षा दुप्पट भाव वाढ करायची. तुम्हाला लाडकी बहीण प्रिय आहे, मग लाडके भाऊ मेले का असा सवाल करत असल्या लोकांच्या नादी न लागण्याचे आवाहन केले आहे. यावेळी रेल्वेमधील नोकऱ्यांबाबत मनसेने परप्रांतियांविरोधात हाती घेतलेल्या आंदोलनाचा परिणाम पुढे मराठी वृत्तपत्रांत आणि पुढे पेपरही मराठीतून आले आणि मराठी तरुणांना रेल्वेमध्ये नोकऱ्या मिळाल्या. जर सत्तेत नसताना मनसे नोकऱ्यांचा प्रश्न सोडवू शकतो तर सत्तेत आल्यावर काय करेल हे असा सवाल करत या लोकांचे नोकर, गुलाम राहू नका असे सांगत तुमच्या समोर चांगला पक्ष मनसेच्या रुपात समोर असल्याने त्यांना एकदा संधी दिली जावी असेही आवाहन केले. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.