राज्यात मागील काही दिवसांपासून विमान कंपन्यांपाठोपाठ हॉस्पिटला बॉम्बने उडविण्याच्या (Bomb Threat) धमक्या येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. परिणामी पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयात (D. Y. Patil Hospital) बॉम्ब ठेवल्याचा मेल अधिष्ठात्यांना आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर सर्व रुग्णालय निर्मनुष्य करण्यात आले. बॉम्ब शोधक पथकाने टप्याटप्याने रुग्णालयाचा कानाकोपरा तपासला, मात्र कुठे ही बॉम्ब आढळला नाही. (Bomb Threat)
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या डीन यांना एक ईमेल आला होता. त्यामध्ये एक बॅग ठेवल्याचं सांगण्यात आले होतं आणि तसं मेलमध्ये उल्लेख ही करण्यात आला होता. या मेलची माहिती समजतात पोलिसांना बॉम्ब स्कॉडला (Bomb Squad) ताबडतोब याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांची पथके देखील ताबडतोब घटनास्थळी दाखल झाली डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाली.
(हेही वाचा – “विधानसभेत जाण्या अगोदर त्याचे पाय…”; Narayan Rane यांचा AIMIM ला कडक इशारा)
बॉम्ब स्कॉड (Bomb Squad) पथकाकडून तपासणी चालू आहे. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा मेला आला होता. त्यानंतर लगेच ही कारवाई सुरू करण्यात आली. रुग्णालयातील सर्व ठिकाण तपासण्यात आली तसेच गर्दीचे ठिकाण असलेली सर्व जागा येत आहेत. कॅन्टीन, पार्किंग ज्या ठिकाणी गर्दी होते ती ठिकाण तपासण्यात येत आहेत. तरी देखील अद्याप पोलीस तपास करत आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community