Fire Brigade : संकटसमयी पोहचण्याचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करा; महापालिका आयुक्तांचे अग्निशमन दलाच्या जवानांना आवाहन

267
Fire Brigade : संकटसमयी पोहचण्याचा कालावधी आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करा; महापालिका आयुक्तांचे अग्निशमन दलाच्या जवानांना आवाहन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई अग्निशमन दलावर (Fire Brigade) अतिशय महत्त्वाची जबाबदारी आहे. या दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे. शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास लाभलेल्या या दलाकडे आज विविध अत्याधुनिक साधने आहेत. त्यामुळे संकटात अडकलेल्या नागरिकांची वेळीच सुटका करण्यास मदत होते. संकटसमयी पोहचण्याचा कालावधी आणखी कमी कसा करता येईल, यासाठी प्रत्येक अग्निशामकाने प्रयत्न करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ६ नोव्हेंबर २०२४ रोजी संवाद साधला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील सभागृहात ही बैठक पार पडली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर आदींसह मुंबई अग्निशमन दलातील (Fire Brigade) अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आयुक्त म्हणाले की, मुंबईकरांना उत्तमोत्तम सेवा-सुविधा देणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची ख्याती जगभरात पसरली आहे. या सेवा-सुविधांमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. कार्यतत्परता, आधुनिकता आणि समयसूचकता या सर्वांमध्ये मुंबई अग्निशमन दल सदैव अग्रेसर असते, असे गौरवोद्गार गगराणी यांनी काढले.

(हेही वाचा – Accident News: हरदोई अपघातात रिक्षाला भरधाव ट्रकने चिरडले, १० जण ठार; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक)

महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनीही अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. एखादी दुर्घटना घडल्यावर मुंबई अग्निश्मन दलाची (Fire Brigade) यंत्रणा कशाप्रकारे कार्यरत असते, याबाबत सैनी यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच विविध अत्याधुनिक यंत्रणांबाबतही माहिती जाणून घेतली. उप आयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी मुंबई अग्निशमन दलात नुकतेच भरती झालेल्या अग्निशामकांशी संवाद साधताना त्यांचे अनुभव जाणून घेतले. मुंबई अग्निशमन दल हा मुंबई महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे, अशा शब्दात गायकवाड यांनी अग्निशमन दलाची पाठ थोपटली.

कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा आणि शौर्यगाथेवर प्रकाश

कार्यक्रमात संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई अग्निशमन दलाचे (Fire Brigade) सामर्थ्य, आधुनिक यंत्रणा, कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा आणि शौर्यगाथेवर प्रकाश टाकण्यात आला. महानगरपालिका आयुक्त गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सभागृहात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जावून हस्तांदोलन केल्याने उपस्थित अधिकारी-कर्मचारी भारावून गेले. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये साठवून घेतला.

(हेही वाचा – India, Qatar Alliance : मनी लाँडरिंग रोखण्यासाठी भारत व कतार येणार एकत्र)

अधिकारी-कर्मचाऱ्यांशी दिलखुलास गप्पा

महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी या संपूर्ण संवादात वेळोवळी मुंबई अग्निशमन दलातील (Fire Brigade) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतेही जाणून घेतली. एखादी दुर्घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाची यंत्रणा कशाप्रकारे धावून जाते इथपासून तर नवनियुक्त अग्निशामकांचे दलातील अनुभवापर्यंत त्यांनी दिलखुलास गप्पा केल्या. या संवादात्मक चर्चेत महिला अधिकारी आणि अग्निशामकांनीही मते व्यक्त केली.

प्राणिसंग्रहालयातील विविध कक्षांना आयुक्तांनी दिली भेट

मुंबई अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अधिकाऱ्यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात फेरफटका मारला. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसाठी असलेल्या वैद्यकीय सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच पेंग्विन कक्षासही भेट दिली. उप अधीक्षक डॉ. कोमल राऊळ यांनी प्राणिसंग्रहालयातील व्यवस्थेबाबत माहिती दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.