विजयानंतर Donald Trump यांचा अजेंडा जाहीर; म्हणाले, मी युद्ध…

106
US Presidential Election 2024 : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे भारतीय शेअर बाजारात उसळी

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतल्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. त्यात दि. ६ नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी विजयरथ खेचून आणत २७७ मतांनी विजय मिळवला.

( हेही वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : मराठवाड्यातील शेतीला दुष्काळाच्या झळा; नेत्यांची संपत्ती मात्र कोट्यवधींच्या घरात)

विजयानंतर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)म्हणाले की, मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ही आतापर्यंतची सगळ्या मोठी राजकीय चळवळ आहे. त्यामुळे आपल्या देशासमोरील समस्या दूर करण्यासाठी सगळे मिळून मदत करणार आहोत. आपण आज इतिहास घडवला आहे. त्यामुळे मी आता देशाच्या सीमा आणि शहरांमध्ये सुधारणा घडवून आणू, असे ही ट्रम्प (Donald Trump) म्हणाले.

तसचे ट्रम्प (Donald Trump) पुढे म्हणाले की, मी तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या भवितव्यासाठी प्रत्येक दिवशी लढत राहीन. शरीरातील शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे. समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यामुळे अमेरिकेसाठी हा सुवर्णकाळ असेल. हा विजय माझा नसून अमेरिकन नागरिकांचा विजय आहे. यामुळे अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे”, असा दावाही ट्रम्प यांनी केला. त्याचबरोबर आपल्याला सुरक्षित सीमा हवेत.आपल्याला समर्थ लष्कर हवंय. पण आपल्याला कधीच ते वापरायची गरज पडणार नाही. मी युद्ध सुरु करणार नाही, तर मी युद्ध थांबवेन, असे ही ट्रम्प (Donald Trump) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.