Maharashtra Assembly Poll : विश्व हिंदू परिषदेची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोहीम

28
Maharashtra Assembly Poll : विश्व हिंदू परिषदेची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मोहीम
  • खास प्रतिनिधी 

हिंदू जिवंत राहिला तर जात आणि पंथ जिवंत राहील, असे सांगून हिंदू हितासाठी लढणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर, राष्ट्रीय प्रवक्ता श्रीराज नायर यांनी केले आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या ३६ विविध संघटना हिंदू समाजाच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अभियान राबवणार असल्याचे नायर यांनी जाहीर केले. (Maharashtra Assembly Poll)

(हेही वाचा – Assembly Election : मतदानाच्या दिवशी अधिकारी, कामगार, कर्मचाऱ्यांना सुट्टी; सर्व कंपन्या आणि संस्थांना महापालिका आयुक्तांनी बजावले निर्देश)

हिंदूंच्या रक्षणासाठी

विश्व हिंदू परिषदेतर्फे बुधवारी (६ नोव्हेंबर २०२४) या दिवशी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना सालेकर यांनी भाजपाचे नाव किंवा चिन्ह यांचा उल्लेख न करता केवळ हिंदूंच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला मतदान करा असे आवाहन केले. “एरव्ही देशाबाहेर काही घडल्यास त्याचे पडसाद देशात उमटतात. पण कॅनडामध्ये हिंदूंवर अत्याचार झाले त्यावर कोणी तथाकथित सेक्युलरवादी काही का बोलत नाहीत? त्यामुळे आपल्या देशातही हिंदूंचे आणि देशाचे रक्षण करणाऱ्या उमेदवारांना जिंकून आणा. जिहादी मतदानाची टक्केवारी वाढत आहे, हे लोकसभा निवडणुकीत मालेगाव-मध्य या एका विधानसभा मतदारसंघाच्या मतदानावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज कारेगा’, यासाठीच विश्व हिंदू परिषद मैदानात उतरणार असून उच्चभ्रू वस्तीसह हिंदू वसाहतींमध्ये जनजागरण मोहीम राबवण्यात येणार आहे,” असे सालेकर यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान ‘फेक नरेटीव्ह’ सेट केल्याबाबत विचारले असता सालेकर यांनी सांगितले की, फेक नरेटीव्ह सेट करण्यासाठी परदेशातून निधी पुरवला जातो.

यावेळी शिव कल्याण केंद्राचे दिनेश तहलियानी तसेच कोंकण प्रांत उपाध्यक्ष प्रिया सावंत यावेळी उपस्थित होते. (Maharashtra Assembly Poll)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.