काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) वारंवार आपल्या सभेत लाल संविधान दाखवत, लोकांना भावनिक आवाहन करत असतात. मात्र आता राहुल गांधी (Rahul Gandhi) सभेत दाखवणाऱ्या लाल संविधानाच्या कोऱ्या पानांचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपाने एक्सवर पोस्ट केला आहे. तसेच भाजपाने संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध केला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या @RahulGandhi यांचा जाहीर निषेध!
लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्या लाल पुस्तकात आहेत फक्त कोरी पाने…
आरक्षण विरोधी @INCIndia ची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना ? pic.twitter.com/sGP9nQFZOL
— BJP Mumbai (@BJP4Mumbai) November 6, 2024
भाजपने एक्सवर लिहलयं की, आरक्षण विरोधी काँग्रेसची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती. त्यामुळे काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे, असा सवाल ही भाजपाने विचारला आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल, असे ही भाजपाने सांगितले आहे.
दरम्यान संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर, सिर्फ नफरत फैलाना है… त्याचबरोबर संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा, अशा शब्दात काँग्रेसचा भाजपाने जोरदार समाचार घेतला आहे. यामुळे राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेतील लाल संविधानाबद्दल सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाल संविधान का? कुणाला इशारा देताय, असा राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) हातातील लाल संविधानावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community