Rahul Gandhi यांचे विधानसभा निवडणुकीतही ‘खटाखट खटाखट…’; लाडकी बहीण योजनेला आधी विरोध, आता उदोउदो  

47

लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देशभरात प्रचार करताना आम्ही सत्तेत आल्यावर गरीब महिलांच्या खात्यात वर्षाला १ लाख रुपये आणि महिन्याला साडे आठ हजार रुपये खटाखट खटाखट पाठवू, असे सांगत सुटले होते. मात्र त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात जिथे काँग्रेसची सत्ता आहे, तिथे महिला काँग्रेसच्या कार्यालयात पैसे मागायला गेल्या तेव्हा त्यांना हाकलून लावण्यात आले. आता Rahul Gandhi यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बुधवार, ६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी येथील सभेत बोलताना पुन्हा महिलांच्या खात्यात दर महिन्याला ३ हजार रुपये खटाखट खटाखट पाठवले जाईल, असे म्हणाले.

(हेही वाचा शरद पवारांचा गड Satara जिल्ह्याला जाणार तडा; निवडणुकीत MVA समोर कडवे आव्हान)

आधी विरोध आता समर्थन 

महायुती सरकारने राज्यातील गरीब महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि महिन्याला दीड हजार रुपये देणे सुरु केले, जून ते नोव्हेंबर अशा सहा महिन्यांचे पैसेही महिलांच्या थेट खात्यात जमा झाले. त्यामुळे मविआतील घटक पक्षांच्या पायाखालची जमीन घसरली. ही योजना दिशाभूल करणारी आहे, निवडणुकीनंतर बंद पडेल, असा अपप्रचार मविआच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली. त्यानंतर या योजनेच्या विरोधात उच्च न्यायालयातही गेले. तरीही मविआ ही योजना बंद करू शकली नाही. त्यामुळे आता मविआनेच निवडणूक अजेंडामध्ये हीच योजना परंतु नवे नाव ‘महालक्ष्मी योजना’ नावाने जाहीर केली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आमचे सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत ३ हजार रुपये दरमहा महिलांच्या खात्यात खटाखट खटाखट देणार आहोत, असे म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.