मविआची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत बीकेसी येथे पहिली प्रचार सभा झाली, त्यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) यांना व्यासपीठावर ‘पहिल्या फळीचे नेते’ असा सन्मान मिळत नव्हता. व्यासपीठावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादीचे शरद पवार, उबाठाचे उद्धव ठाकरे होते, सभेचे सूत्रसंचालन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले, पण संजय राऊत कुठेच दिसले नाही, त्यांना पहिल्या रांगेत सुनील प्रभू, नंतर वर्षा गायकवाड त्यानंतर दोन खुर्च्या सोडून कोपऱ्यात खुर्ची देण्यात आली होती, पोडियमच्या मागे राऊत Sanjay Raut झाकले जात होते. मविआतील काँग्रेस पक्षाने संजय राऊतांना झापल्यानंतर त्याचे हे परिणाम दिसले का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
या प्रचारसभेत राहुल गांधी, खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे झाली पण यापैकी कुणीही खुद्द उद्धव ठाकरे यांनीही उपस्थितांची नावे घेताना संजय राऊतांचे Sanjay Raut नाव घेतले नाही. तसेच राऊत समोर दिसतील असेही व्यासपीठावर बसलेले नव्हते, संपूर्ण व्यासपीठावर संजय राऊतांचे अस्तित्वच दिसत नव्हते. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मविआमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली तेव्हा उबाठाकडून संजय राऊत हे चर्चा करत होते. जागावाटपाच्या अनेक बैठकांमध्ये संजय राऊतSanjay Raut आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात खडाजंगी झाली. संजय राऊत यांनी शिवसेनेला शंभरापेक्षा जास्त जागा सोडा, अशी मागणी करत राहिले आणि काँग्रेस त्याला विरोध करत राहिले, हा वाद इतका टोकाला पोहचला की महाआघाडी फुटण्याची वेळ आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस एकत्र येतील आणि उबाठा वेगळा होईल का, अशी चर्चा सुरु झाली. अखेरीस महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी रमेश चेनिथल्ला हे चर्चेसाठी आले, त्यांनी नाना पटोले यांना चर्चेतून बाजूला करून बाळासाहेब थोरात यांना ठेवले, तर उबाठाने संजय राऊतांना बाजूला केले. आज प्रचार सुरु झाला आहे संजय राऊतांची सभा कुठेही दिसत नाही. मविआच्या सभेत नाना पटोले सूत्रसंचालक म्हणून दिसले, पण संजय राऊत Sanjay Raut कोपऱ्यात बसलेले दिसले, त्यामुळे मविआमध्ये राऊत पहिल्या फळीतून गायब झाले का, अशी चर्चा सुरु झाली.
Join Our WhatsApp Community