- ऋजुता लुकतुके
आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी दहाही संघ मालकांनी त्यांच्याकडे कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी ऑक्टोबर महिन्यात सादर केली. यात कोलकाता फ्रँचाईजीने युवा रिंकू सिंगवर (Rinku Singh) विश्वास दाखवला आहे. पुढील तीन हंगामांसाठी १३ कोटी रुपये देऊन त्यांनी रिंकूला आपल्याकडे कायम ठेवलं आहे. या पैशातून रिंकूने पहिली खरेदी केली आहे ती आपल्या स्वप्नातील घराची. रिंकूने अलिगड या आपल्या मूळ गावी ओझॉन सिटीमध्ये ५०० वर्ग यार्ड जागेवर आपलं नवीन घर बांधलं आहे आणि त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचं समजतंय.
रिंकू (Rinku Singh) बरोबर त्याच्या घरातील सर्व सदस्यांनी याच आठवड्यात घराची चावी ताब्यात घेतली आणि गृहप्रवेशही केला आहे. रिंकूचा घरातील सदस्यांबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हेही वाचा – Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)
भारतीय क्रिकेट टीम के स्टार बल्लेबाज रिंकू सिंह ने अलीगढ़ के ओजोन सिटी में स्थित द गोल्डन एस्टेट में एक आलीशान कोठी खरीदी है। 500 वर्ग गज के इस घर की रजिस्ट्री बुधवार को हुई और शाम को परिवार के साथ नए घर में प्रवेश किया गया। pic.twitter.com/UBmPIyQ3Sh
— Sanjay Kishore (@saintkishore) November 2, 2024
२७ वर्षीय रिंकू सिंग (Rinku Singh) भारताकडून २६ टी-२० सामने खेळला आहे आणि मधल्या फळीत येऊन घणाघाती फलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याच्या नावावर ३ अर्धशतकांसह ४७९ धावा जमा आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्ट्राईकरेट १७५ धावांचा आहे आणि अनेकदा संघ संकटात असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून त्याने संघाला तारलं आहे. टी-२० प्रकारातील तो भरवशाचा फलंदाज आहे. टी-२० विश्वचषकाच्या वेळी भारतीय संघात त्याचा समावेश थोडक्यात हुकला होता. तो राखीव खेळाडूंमध्ये होता.
कोलकाता नाईट रायडर्स या गतविजेत्या फ्रँचाईजीने सहा खेळाडूंना आपल्याकडे कायम राखलं. यात रिंकू सिंग (Rinku Singh) ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती होती. कर्णधार श्रेयस अय्यरला त्यांनी मुक्त केलं. पण, डावखुऱ्या रिंकू सिंगवर विश्वास दाखवला आहे. संघाने विजेतेपद मिळवलेलं असताना पुढील हंगामात कर्णधारालाच डच्चू देण्याचं उदाहरण आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा घडलं आहे. यापूर्वी २००९ मध्ये सनरायझर्स हैद्राबादने ॲडम गिलख्रिस्टला मुक्त केलं होतं. पुढे २०२२ मध्ये त्यांनी डेव्हिड वॉर्नरला बाहेरचा रस्ता दाखवला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community