Maharashtra Assembly Election 2024 : मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी १८० संघटना कार्यरत

120
Maharashtra Assembly Election 2024 : मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी १८० संघटना कार्यरत
Maharashtra Assembly Election 2024 : मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी १८० संघटना कार्यरत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्था मुसलमान मतदारांमध्ये बैठका घेत आहेत आणि त्यांना मतांची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन करत आहेत. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राज्यात प्रचारही जोरदार सुरू आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत सत्ताधारी महायुती (भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना-शिंदे गट) आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट आणि शिवसेना- उबाठा गट) यांच्यात आहे.

(हेही वाचा – Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अनेक स्वयंसेवी संस्था राज्यातील मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी काम करत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यात तळागाळातील 180 स्वयंसेवी संस्था मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी कार्यरत आहेत. यामुळे समाजाच्या मतदानाची टक्केवारी वाढेल. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवाजीनगर, मुंबादेवी, भायखळा आणि मालेगाव सेंट्रलसारख्या मुस्लिम भागात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वयंसेवी संस्था काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या भागात मतदानाची टक्केवारी जास्त होती.

महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे

भाजपाचे युवा नेते आणि वांद्रे विधानसभेचे तरुण उपसभापती भरत सिंग यांनी हिंदुस्तान पोस्टला सांगितले की, त्यांनी कितीही बैठका घेतल्या तरी काहीही होणार नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे आणि या वेळी महायुतीसह भाजपला बहुमत मिळेल. आम्हाला आमच्या मतदारांवर विश्वास आहे, मग ते मुस्लिम मतदार असोत किंवा हिंदू मतदार, आमचे सरकार सर्वांसाठी काम करते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व जनतेला मिळाला आहे. महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत आहे आणि आम्ही सर्वांच्या विकासासाठी काम करत आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.