EPF : फक्त मिस कॉल देऊन जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलन्स

EPF : फक्त फोनवर तुमचा पीएफ जाणून घेण्यासाठी मोबाईल क्रमांक खात्याशी जोडलेला हवा. 

207
EPF : फक्त मिस कॉल देऊन जाणून घ्या तुमचा पीएफ बॅलन्स
  • ऋजुता लुकतुके

तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओचे खातेदार असाल तर तुमची शेवटची जमा रक्कम किंवा खात्यात असलेली शिल्लक जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक मिस कॉल करावा लागणार आहे. ही सगळी माहिती एका क्षणात तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक तुमच्या युएएन नंबरशी जोडलेला हवा आणि ही ऑनलाईन जोडणीही काही मिनिटां करता येते.

युएएनकडे तुमच्या फोन क्रमांकाची नोंदणी झाली असेल तर तुम्हाला फक्त ९९६६०४४४२५ या क्रमांकावर फोन करायचा आहे. तुम्ही मोबाईल नोंदणी करत असताना तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक आणि बँक खातं दिलेलं असतं. त्यावरून तुम्हाला तुमच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत असलेली रक्कम सांगणं ईपीएफओला कळू शकते. (EPF)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule: घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा ‘मातोश्री‘त बसून वचननामा प्रकाशित!)

मोबाईलवर मिस कॉल देण्याची सुविधा सुरू करण्यासाठी तुमच्याकडे खालील गोष्टी हव्यात,

१. मोबाईल क्रमांकावर युएएल पोर्टल सुरू असलं पाहिजे

२. केवायसी पैकी किमान एक ओळखपत्र हे युएएलशी जोडलेलं असलं पाहिजे – आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खातं

त्यानंतर तुम्ही वर दिलेल्या क्रमांकावर फोन केलात की दोन रिंगनंतर फोन आपोआप बंद होईल. त्यामुळे तुम्हाला या फोन कॉलचे पैसे पडणार नाहीत. आणि मग तुम्हाला तुमच्या खात्याशी संबंधित सगळी माहिती मिळू शकेल. तुम्हाला युएएन पोर्टल सुरू करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला खालील वेबसाईटवर जावं लागेल. https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/

(हेही वाचा – Rinku Singh : कोलकाता फ्रँचाईजीकडून १३ कोटी मिळालेल्या रिंकू सिंगने बांधलं स्वप्नातलं घर)

याशिवाय ईपीएफओ वेबसाईटवर तुम्हाला तुमचा निवृत्ती वेतनाची जमा झालेली रक्कमही समजू शकेल.

१. ईपीएफओ वेबसाईटवर (epfindia.gov.in) जाऊन आधी लॉग इन करावं लागले

२. इथं कर्मचाऱ्यांसाठी या विभागात सर्व्हिसेस म्हणजे सेवा विभागात जायचं

३. सेवा विभागात पासबुक वर क्लिक करावं

४. इथं क्लिक केल्यावर तुम्ही नवीन वेबसाईटवर जाता – passbook.epfindia.gov.in

५. इथं तुम्ही युएएन क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा आहे

६. साईन-इन केल्यावर तुमच्या मोबाईल क्रमांकावर सहा आकडी ओटीपी पाठवला जाईल

७. बरोबर ओटीपी टाकल्यावर तुमच्या खात्याशी संबंधित माहिती समोर येईल. (EPF)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.