यमुनेच्या (Delhi Air Pollution) काठावर छठपूजा साजरी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित असल्याचे न्यायालयाने बुधवारी (६ नोव्हें.) सांगितले. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) गुरुवारी सकाळी 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक मॉनिटरिंग स्टेशन्समध्ये AQI 367 च्या वर नोंदवण्यात आला आहे. (Delhi Air Pollution)
(हेही वाचा-Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)
122 छोट्या-मोठ्या नाल्यांमधून 184.9 MGD प्रक्रिया न केलेले सांडपाणी दररोज दिल्लीतील यमुना नदीत सोडले जाते. जे यमुनेच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, केंद्र आणि दिल्ली सरकारने गेल्या 7 वर्षांत यमुनेच्या स्वच्छतेसाठी 7,000 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. (Delhi Air Pollution)
(हेही वाचा-Rinku Singh : कोलकाता फ्रँचाईजीकडून १३ कोटी मिळालेल्या रिंकू सिंगने बांधलं स्वप्नातलं घर)
यमुनेच्या कोणत्याही भागाचे पाणी पिण्यासाठी, अंघोळीसाठी किंवा स्पर्श करण्यासारखे नाही. गुरुवारी सकाळी दिल्लीच्या वातावरणात धुक्याचा थर दिसून आला. अक्षरधाम मंदिर आणि परिसरातील हवेची गुणवत्ता ‘खराब’ श्रेणीत असल्याचे आढळून आले. (Delhi Air Pollution)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community