- ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत सपशेल अपयशी ठरला. शेवटच्या पाच कसोटी डावांमध्ये मिळून तो १०० धावाही करू शकला नाही. त्याच्या धावा आहेत ०, ७०, १, १७, ४ आणि १. अशावेळी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही तो पहिल्या विसातून बाहेर फेकला गेला आहे. विराट आता २२ व्या क्रमांकावर आहे. आणि तो पाकिस्तानचे सध्या फॉर्ममध्ये नसलेले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याही खाली गेला आहे. (ICC Test Ranking)
बोर्डर-गावस्कर मालिका समोर असताना विराट कोहलीचा फॉर्म ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे. यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट आणि अजिंक्य राहणे या फलंदाजांनी भारताला यश मिळवून दिलं आहे. त्यांच्या जीवावर दोनदा बोर्डर-गावस्कर चषक भारताने ऑस्ट्रेलियातच आपल्याकडे राखला. आता यंदा ही कामगिरी करायची असेल तर विराटला आपली कामगिरी उंचवावी लागेल. रहाणे तर आता संघात नाहीए. (ICC Test Ranking)
(हेही वाचा – Rinku Singh : कोलकाता फ्रँचाईजीकडून १३ कोटी मिळालेल्या रिंकू सिंगने बांधलं स्वप्नातलं घर)
Major shake-up in the top 10 of the ICC Men’s Test Player Rankings across the board after #INDvNZ and #BANvSA series 🔥#WTC25 | Details ⬇https://t.co/2XzsyYtCVp
— ICC (@ICC) November 6, 2024
कोहलीची क्रमवारीत पिछेहाट झाली असली तरी रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांच्यामुळे भारतीय फलंदाजांना निदान या क्रमवारीत स्थान मिळवता आलं आहे. तिसऱ्या कसोटीतील दमदार कामगिरीमुळे रिषभ पंत फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर यशस्वी जयस्वाल चौथ्या क्रमांकावर कायम आहे. शुभमन गिलही चार स्थानांनी वर पोहोचला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध या चार फलंदाजांवर भारताची मदार असणार आहे. शुभमन आणि यशस्वी यांचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा असल्यामुळे विराट कोहलीला महत्त्वाची भूमिका निभावावी लागणार आहे. (ICC Test Ranking)
विराट कोहली ऑस्ट्रेलियात १३ कसोटी सामने खेळला आहे आणि यात त्याने ५४ च्या सरासरीने १,३५२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर तब्बल ६ शतकं आहेत. एकूण ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने २,००० च्या वर धावा केल्या आहेत. (ICC Test Ranking)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community