लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज

98
लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज
लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज

अनेक जण जमिनी विकून, नोकऱ्या सोडून निवडणुकीसाठी तयार झाले होते. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आवाहनानुसार अनेकांनी अर्ज भरले. जरांगेंनी माघार घेतल्यामुळे लोकांची अडचण झाली. दलित आणि मुस्लीम यांनी यादी दिली नाही; म्हणून माघार घेतली असल्याचे जरांगे म्हणाले. जरांगे चुकीचे सांगत आहेत, आम्ही त्यांच्याकडे यादी सुपूर्द केली होती, असा गौप्यस्फोट राजरत्न आंबेडकर (Rajaratna Ambedkar) यांनी केला.

(हेही वाचा – Delhi Air Pollution: दिल्लीतील AQI 367 च्या वर; यमुनेच्या काठावर छठपूजेस बंदी, त्वचाविकाराचा धोका वाढला)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आंतरवाली सराटीत जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची अनेकदा भेट घेतली होती. ‘आम्ही तुमच्यासाठी फक्त मत देणारे साधन आहोत का? असा सवाल करीत मनोज जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी किंवा विरोधक दोन्ही पक्षांना प्रचारासाठी उतरू देणार नाही’, असा इशारा त्यांनी दिला होता.

आता मात्र मनोज जरांगे यांच्या भूमिकेमुळे राजरत्न आंबेडकर दुखावले आहेत. मनोज जरांगे यांनी लोकांची दिशाभूल करू नये. (Maharashtra Assembly Election 2024) मराठा समाजातील (Maratha Reservation) आणि दलित समाजातील अनेकांचे मला फोन येत आहेत. तुम्ही यादी का दिली नाही? अशी विचारणा करणारे फोन आल्याने त्यांना काय उत्तरे देऊ? मी त्यांना वस्तुस्थिती सांगतो आहे. इतके उमेदवार होते की, बऱ्याच जणांना माघार घ्यायला लागली असती; परंतु यादीचे कारण पुढे करून जरांगे वेळ मारून नेत आहेत, असे आंबेडकर (Rajaratna Ambedkar) म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.