महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये मतदारांना प्रलोभन देण्याची प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत 558 कोटी रुपये मूल्यांची रोकड, मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तू, मद्य, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू जप्त केले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा – ICC Test Ranking : विराट कोहली, रोहितला आयसीसी क्रमवारीत जबरदस्त धक्का, पहिल्या विसातून गायब)
निवडणुका जाहीर झाल्यापासून केवळ महाराष्ट्र राज्यात केलेल्या कारवाई अंतर्गत सुमारे 280 कोटी रुपये मूल्याचा माल जप्त केला गेला आहे. तर झारखंडमधूनही आतापर्यंत आणखी 158 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही राज्यांमध्ये यंदा होत असलेल्या निवडणुकांमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एकत्रित जप्तीचे प्रमाण 3.5 पटीने वाढले आहे, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 103.61 कोटी रुपये मूल्याचा मुद्देमाल तर झारखंडमध्ये 18.76 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला होता. खाली दिलेल्या तक्त्यात जप्ती संबंधीचा तपशील मांडला आहे. यात 40% पेक्षा जास्त प्रमाण हे मोफत वाटपासाठी आणलेल्या प्रलोभनपर वस्तूंचे आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community