US Presidential Election 2024 : कमला हॅरिस यांच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे

US Presidential Election 2024 : कमला हॅरिस यांना एकतर्फी हरवून डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आहेत. 

60
US Presidential Election 2024 : कमला हॅरिस यांच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेचे १४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची निवड आता अटळ आहे. त्यांना विजयी घोषितही करण्यात आलंय. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि भारतीय वंशांच्या कमला हॅरिस यांना आतापर्यंत २२६ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर ट्रंप यांना २९७. अजून नेवाडा आणि ॲरिझोना या दोन राज्यांतील मतमोजणी बाकी आहे. न्यूयॉर्क टाईम्सने ट्रम्प यांची अंतिम मत संख्या ३०६ असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या लढतीत खरंतर कमला हॅरिस या लोकप्रिय उमेदवार मानल्या जात होत्या आणि त्यामुळेच अध्यक्षीय लढत अटीतटीची असेल असाच जाणकारांचा होरा होता. पण, प्रत्यक्षात ट्रम्प यांचा एकतर्फी विजय झाला आहे. तर कमला हॅरिस यांचा पराभव. (US Presidential Election 2024)

ढोबळ मानाने हॅरिस यांच्या पराभवाची ५ कारणं पाहूया,

१. आर्थिक धोरणांत ट्रम्प अधिक विश्वसनीय – अमेरिकेतील आताची निवडणूक ही आर्थिक मुद्यांवर लढली गेली, असं जाणकारांचं मत आहे. लोकांना बेरोजगारी, आर्थिक विकास आणि महागाई यांची उत्तरं हवी होती. पारंपरिक दृष्ट्या आर्थिक धोरणांच्या बाबतीत अमेरिकन जनतेचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास होता. आधीच्या कारकीर्दीतही ट्रम्प आपली आर्थिक धोरणं पटवून देण्यात यशस्वी झाले होते. तीच पुढे चालवू इतका प्रचार ट्रम्प यांना पुरला. याउलट कमला हॅरिस यांना ट्रम्प यांचे आर्थिक मुद्दे खोडून काढता आले नाहीत. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – ICC Test Ranking : विराट कोहली, रोहितला आयसीसी क्रमवारीत जबरदस्त धक्का, पहिल्या विसातून गायब)

२. अमेरिकन जनतेचा विश्वास – अमेरिकेत खुलं वातावरण असलं तरी श्वेतवर्णीय विरुद्ध कृष्णवर्णीय असा सामाजिक मोठा लढा तिथे आहे आणि ट्रम्प यांना श्वेतवर्णीय लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. २०२० ची अध्यक्षीय निवडणूक ते हरले तेव्हाही श्वेतवर्णीयांनी त्यांनाच पाठिंबा दिला होता. त्यामुळे ट्रम्प यांची मताची टक्केवारी कमी नव्हती. खासकरून स्विंग राज्यांतील श्वेतवर्णीय मतं ट्रम्प यांच्या बाजूने पडल्यामुळे चित्र बदललं. याउलट कमला हॅरिस यांचे आई वडील निर्वासित म्हणून इथं आलेले आणि त्या स्वत: भारतीय-विंडिज अशा मिश्र वंशाच्या. त्यामुळे अमेरिकन जनतेची पारंपरिक मतं ही हॅरिस यांना मिळाली नाहीत. शिवाय अमेरिकन जनतेत पूर्वापार असलेला लिंगभेद इथं दिसला. एरवी अमेरिकन समाज खुल्या मनाचा असला तरी आतापर्यंत एकदाही त्यांनी महिला उमेदवाराला राष्ट्राध्यक्ष केलेलं नाही. (US Presidential Election 2024)

३. हॅरिस यांची फसलेली भाषणं – आपल्या भाषणांमधून लोकांमध्ये पुरेसा उत्साह निर्माण करण्यात कमला हॅरिस अपयशी ठरल्या. हॅरिस यांची विचारसरणी डाव्या बाजूला झुकणारी आहे. सुरुवातीच्या अध्यक्षीय वादविवादांमध्ये त्यांनी आघाडी घेतली असली तरी नंतरच्या त्यांची भाषणं मिळमिळीत आणि अस्पष्ट होती. खास करून अमेरिकन अर्थकारणावर काही ठोस उपाय त्या लोकांसमोर ठेवू शकल्या नाहीत. भाषणांमधून आपली ठाम मतंही त्या व्यक्त करू शकल्या नाहीत. त्यातून त्यांचं नेतृत्व कमजोर ठरलं. (US Presidential Election 2024)

(हेही वाचा – Bhuvneshwar Kumar : भुवनेश्वर कुमारचा विक्रम ‘हा’ भारतीय गोलंदाज मोडू शकतो)

४. स्विंग राज्यांमध्ये पराभव – अमेरिकेत उत्तरेकडील राज्य आणि दक्षिणेकडील राज्य हे पारंपरिक विभाजन आजही निवडणुकीच्या वेळी दिसतं. दक्षिणेकडची राज्य ही जुन्या काळातील मळेवाली आणि जमीनदारांची राज्य आहेत. ही राज्य जुन्या रुढी आणि परंपरांना जोडलेली आहेत. तर उत्तेरकडील राज्य ही तरुणांची आणि नवविचारांची आहेत. दक्षिणेकडील राज्य ही पारंपरिक दृष्ट्या रिपब्लिकन गड आहेत. तर उत्तरेत डेमोक्रॅटिक पक्षाचा जोर जास्त आहे. याशिवाय अमेरिकन राजकारणात सात राज्यं अशी आहेत जिथे सत्तेचं पारडं कायम इकडून तिकडे सरकत असतं. पेन्सिलव्हेनिया, नेवाडा, नॉर्थ कॅरोलायना, जॉर्जिया, ॲरिझोना, मिशिगन आणि मिशिगन ही यंदाची स्विंग राज्य होती. या राज्यांमध्ये मिळून एकूण तब्बल ८३ इलेक्टोरल मतं होती आणि यातील बहुतेक मतं ट्रम्प यांना मिळाली. पारंपारिकरित्या अशी १३ स्विंग राज्य अमेरिकेत आहेत. पण, यावेळी यातील ८ राज्यांनी आपलं मत आधीच ठरवल्याचं चिन्ह होतं. (US Presidential Election 2024)

५. डेमोक्रॅटिक असंतोष – अध्यक्षीय निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार कोण असणार यावर पक्षात एकवाक्यता नव्हती. सुरुवातीला तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच उमेदवारी दिली गेली. पण, ते वादविवादात मागे पडताना पाहून अचानक उमेदवार बदलला आणि फक्त १०० दिवस बाकी असताना कमला हॅरिस यांची डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे हॅरिस यांना प्रचारासाठी खूपच कमी वेळ मिळाला. तेव्हाही कमला हॅरिस यांच्या भारतीय वंशामुळे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक खूप होते. एकूणच डेमोक्रॅटिक पार्टीकडे सक्षम नेतृत्वाचा अभाव दिसून आला आणि त्याचा फटका पक्षाला निवडणुकीत दिसला. (US Presidential Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.