मनसे (MNS) विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा) गटात प्रवेश करत आमदार आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले आहे. वांद्रे पूर्वेत मनसेकडून (MNS) तृप्ती सावंतांना तिकिट दिल्याने अखिल चित्रे नाराज असल्याची चर्चा होती. (Akhil Chitre)
( हेही वाचा : लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज)
मात्र पक्षप्रवेशानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत चित्रे (Akhil Chitre) म्हणाले की, मी जेव्हा राजकारणाला सुरुवात केली तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख म्हणून काम करत होतो. त्यामुळेच मला परत यावे असे वाटले. कारण ज्या विचाराबरोबर मी १८ वर्ष होतो तो विचार मनसेत बाजूला टाकण्यात आलाय. तसेच वांद्रे पूर्वेला मनसेच्या इच्छुकांची यादी जर आपण पाहिली तर मनसेच्या इच्छुकांमध्ये माझे नाव नव्हते. मुळात मी वांद्रे पूर्वेत मी इच्छुक नव्हतो. पण पक्षातील निष्ठावंताना डावलल्याने मी पुन्हा मागे वळलो, असे ही चित्रे (Akhil Chitre) म्हणालेत. (Akhil Chitre)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community