काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दि. ६ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरोप केले. तसेच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा मोडणार असेही ते म्हणाले. त्यानंतर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नागपूरच्या सभेत दाखवलेल्या लाल संविधानाच्या पुस्तिकेबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपाने लाल संविधानातील कोऱ्या पानांचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला. (Devendra Fadnavis)
( हेही वाचा : ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दिवाळी अंक आला; Raj Thackeray यांच्या हस्ते प्रकाशन)
याबाबत दि. ७ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला. तेव्हा फडणवीस म्हणाले की, भारताच्या संविधानाबद्दल काँग्रेसच्या राहुल गांधींची (Rahul Gandhi) अनास्था पाहायला मिळाली. तसेच दि. ५ नोव्हेंबरला मी लाल पुस्तकाबाबत केलेला आरोप खरा ठरला. राहुल गांधी (Rahul Gandhi) संविधानाचा गौरव करू इच्छित नाहीत. तर त्यांच्याबरोबर असलेल्या अर्बन नक्षलांची मदत करण्यासाठी राहुल गांधींनी ही लाल पुस्काची नौटंकी केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) संविधानाचा रोज अपमान करतात. आतापर्यंत काँग्रेसने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान याचा खूप वेळा अपमान केला. परंतु आता त्यांच्या या लाल संविधानाच्या नौटंकीला कुणीच भूलणार नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांची मदत घेण्यासाठी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) हाती लाल पुस्तक आहे, अशी टीकाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली आहे.
‘हिंदुस्थान पोस्ट’चा ‘डावा दहशतवाद डीप स्टेट’ या विषयावरील दिवाळी अंक आपल्याला हवा असल्यास ९२२००७०३८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community