ई-कॉमर्स मधील सर्वात प्रमुख दोन कंपन्या असलेल्या ॲमेझॉन (Amazon ) आणि फ्लिपकार्टवर (Flipkart) केंद्रीय अन्वेषण एजन्सी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) अत्यंत कडक कारवाई केली आहे. दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. देशात 21 हून जास्त ठिकाणी या कंपन्या त्यांच्या उपकंपन्यांवर शोधमोहीम राबवली जात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट विरुद्ध फेमा (FEMA) उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, या दोन कंपन्यांवर त्यांच्या इतर अनेक सहयोगी कंपन्यांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री केल्याचा आरोप आहे. तसेच या अंतर्गत सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे फेमा उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला आहे. यासंबंधित संलग्न कंपन्यांची नावे ही एपिरिओ रिटेल, श्रीयस रिटेल, दर्शिता रिटेल आणि आशियाना रिटेल असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा-नक्षलवाद्यांची मदत घेण्यासाठी राहुल गांधींच्या हाती लाल पुस्तक; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)
FEMA म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा ( Foreign Exchange Management Act) हा भारत सरकारने 1999 मध्ये लागू केलेला कायदा आहे, या कायद्याचा मुख्य उद्देश हा परकीय चलनाच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे आणि व्यापाराला प्रोत्साहन देणे हा आहे. पुर्वीच्या फेरा कायद्याऐवजी सरकारकडून फेमा कायदा आणण्यात आला होता. FEMA चे मुख्य उद्दिष्ट बाह्य व्यापार आणि देयके सुलभ करणे हे आहे आणि ते परकीय चलन व्यवहारांसाठी प्रक्रिया निर्धारित करते.
फेमा (FEMA) चे उल्लंघन आणि कारवाई
जेव्हा एखादी व्यक्ती किंवा संस्था या कायद्यांतर्गत विहित नियमांचे पालन करत नाही तेव्हा फेमाचे उल्लंघन होते. उल्लंघनाची काही सामान्य उदाहरणे आहेत.
अनधिकृत व्यवहार : म्हणजेच परवानगीशिवाय परकीय चलनाचे व्यवहार करणे.
कमाल मर्यादेचे उल्लंघन: विहित मर्यादेपेक्षा परदेशात पैसे पाठवणे.
चुकीचा अहवाल देणे: खोटी माहिती देणे किंवा परकीय चलन व्यवहार लपवणे.
फेमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. ज्यामध्ये तिप्पट दंड किंवा 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड समाविष्ट असू शकतो.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community