Assembly Election 2024 : आदिवासीबहुल गडचिरोलीत बाप-लेक लढत लक्षवेधी!

59
Assembly Election 2024 : आदिवासीबहुल गडचिरोलीत बाप-लेक लढत लक्षवेधी!

राज्यातील आदिवासीबहुल गडचिरोली जिल्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला असून जिल्ह्यातील लक्षवेधी लढत ही अहेरीत वडील विरुद्ध मुलगी अशी होणार आहे. विद्यमान मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत आणि हीच लढत या जिल्ह्यातील लक्षवेधी ठरणार आहे. (Assembly Election 2024)

या जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी असे तीन विधानसभा मतदारसंघ येत असून तीनही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. आरमोरी या मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर गडचिरोलीमध्ये ९ आणि अहेरी मतदारसंघात १२ उमेदवार यांच्यात लढत होणार आहे. तीनही मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती, मात्र अनेकांना पक्षाकडून समजावण्यात यश आल्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतले तर अद्याप काही बंडखोर निवडणूक रिंगणात कायम आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – US Presidential Election 2024 : ‘या’ १० गोष्टींमुळे साध्य झाला डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय)

जनतेचा कौल कुणाला?

अहेरीत महायुती आणि महाविकास आघाडीने आत्राम बाप-लेक यांना अधिकृत उमेदवारी दिली असतानाही भाजपाचे बंडखोर माजी राज्यमंत्री अंबरीषराजे आत्राम आणि काँग्रेसकडून हनुमंत मडावी यांनी बंडखोरी करीत आत्राम कुटुंबालाच आव्हान दिल्याने मतदारसंघात जनता कुणाला कौल देते हे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Assembly Election 2024)

आरमोरी मतदारसंघात भाजपाकडून कृष्णा गजबे आणि काँग्रेसकडून रामदास मसराम आमने-सामने आहेत तर गडचिरोलीमधून भाजपाचे डॉ. मिलिंद नरोटे आणि मनोहर पोरेटी यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – US Presidential Election 2024 : कमला हॅरिस यांच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे)

७० टक्के जंगल असलेल्या या जिल्ह्यात तेंदूपत्ता, आवळा, बेहडा, हिरडा, मोहा हे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून जंगल उत्पादनावर पूरक व्यवसाय किंवा कारखाने निर्माण झाल्यास विकासाला चालना मिळेल. (Assembly Election 2024)

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असून हा एक प्रमुख राजकीय मुद्दा असल्याचे काही तज्ञांचे मत आहे तर काहींच्या मते हा विषय राजकीय आहे. मात्र दारूबंदीमुळे जिल्ह्यात बाहेरून दारूची तस्करी होत असल्याची चर्चा आहे. नक्षलवाद हादेखील एक प्रमुख मुद्दा होता मात्र महायुतीने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे प्रमाण कमी झाल्याचे दावा सरकारकडून करण्यात येतो. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.