chalisgaon maharashtra : चाळीसगाव शहराला का आलं आहे इतकं महत्त्व?

73
chalisgaon maharashtra : चाळीसगाव शहराला का आलं आहे इतकं महत्त्व?

भारतात महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव नावाचं एक तालुक्याचं शहर आहे. या चाळीसगाव शहराचे ‘जुनं शहर’ आणि ‘नवीन शहर’ असे दोन मुख्य भाग आहेत. या दोन्ही भागांच्या मधोमध एक नदी वाहते. त्या नदीचं नाव ‘तितुर’ असं आहे. (chalisgaon maharashtra)

चाळीसगाव शहराचं दळणवळण

चाळीसगाव हे शहर रेल्वेमार्ग आणि राज्य महामार्गांनी इतर शहरांशी व्यवस्थित जोडलेलं आहे. चाळीसगाव हे शहर भुसावळ स्थानकाच्या जवळ असलेलं सेंट्रल रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरचं एक महत्वाचं जंक्शन आहे. चाळीसगाव येथून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचं स्थानक असल्यामुळे या स्थानकावर बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. चाळीसगाव या शहरापासून मुंबई आणि पुणे ही शहरं अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. तर जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि धुळे ही शहरं चाळीसगाव येथून साधारणतः सारख्या अंतरावरच आहेत. (chalisgaon maharashtra)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी १८० संघटना कार्यरत)

चाळीसगाव शहराची भौगोलिक माहिती

चाळीसगाव हे तालुक्याचं शहर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्याच्या नैऋत्य दिशेला आहे. चाळीसगावच्या उत्तर दिशेला धुळे जिल्हा व पारोळा तालुका आहे. तर पश्चिम दिशेला नाशिक जिल्हा, दक्षिण दिशेला औरंगाबाद जिल्हा आणि पूर्व दिशेला पाचोरा आणि भडगाव ही तालुक्याची गावं आहेत. चाळीसगाव हे शहर डोंगरी आणि तितूर या नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे. या दोन्ही नद्या पुढे गिरणा नदीला जाऊन मिळतात. गिरणा नदी पुढे अरबी समुद्राला मिळणाऱ्या तापी नदीला जाऊन मिळते. (chalisgaon maharashtra)

चाळीसगाव इथली पर्यटन स्थळे

चाळीसगाव शहराच्या दक्षिण दिशेला सातमाळा नावाची डोंगररांग आहे. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या ही चाळीसगावच्या अगदी जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. याव्यतिरिक्त इतर पर्यटनस्थळांपैकी पाटणादेवी व पितळखोरे लेणीसुद्धा पाहण्यासारखी आहेत. पाटणादेवी मंदिराची रचना ही हेमाडपंती स्थापत्यशैलीत मोडते. तसंच बहाळ कजबे इथलं श्रीरामांनी स्थापन केलेलं श्री काशीविश्वेश्वर महादेव मंदिर आणि पुरातन काळातल्या पाऊलखुणा असलेले किल्ले येथे आहेत. (chalisgaon maharashtra)

(हेही वाचा – केंद्र लवकरच राष्ट्रीय दहशतवादविरोधी धोरण जारी करणार: Amit Shah)

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात केकी मुस यांचं कलादालन आहे. केकी मूस हे एक पारसी गृहस्थ होते. त्यांचं आयुष्य एका छताखाली व्यथित आणि करुण अवस्थेत गेलं. पण आयुष्याशी झगडताना त्यांनी अनेक कलांना जन्म दिलेला आहे. टेबल टॉप फोटोग्राफी हा त्यांनीच केलेला एक कलेचा आविष्कार आहे. त्यांच्या या कलेसाठी त्यांना जागतिक स्तरावरचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तसंच राम सुतार यांनी बनवलेल्या सुबक मूर्तीही या कलादालनात ठेवण्यात आल्या आहेत. या कलादालनातल्या सर्वच कलाकृती नक्कीच एकदा तरी त्या ठिकाणी जाऊन पाहण्यासारख्या आहेत. (chalisgaon maharashtra)

चाळीसगाव शहरातले उद्योग

चाळीसगाव शहरामध्ये शेती उत्पन्नावर आधारित असलेला बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तसंच तेल आणि विड्यांचे कारखाने यांसारख्या इतर उद्योगांना चालना मिळावी म्हणून, या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं चाळीसगाव हे उद्योग क्षेत्र आहे. तसंच मक्यावर प्रक्रिया करून स्टार्च, लिक्विड ग्लुकोज बनविण्याचा कारखाना सुद्धा इथे उभारण्यात आलेला आहे. (chalisgaon maharashtra)

(हेही वाचा – srikalahasti temple चे वैशिष्ट्य जाणून व्हाल थक्क!)

चाळीसगाव इथला शेती व्यवसाय

चाळीसगाव शहर आणि त्याच्या जवळपासच्या भागांमध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ऊस, कपाशी आणि केळी ही इथली मुख्य पिकं आहेत. याव्यतिरिक्त इथे भुईमुगाचीही लागवड होते. तसंच ज्वारी, बाजरी आणि गहू ही धान्यही घेतली जातात. या भागात बहुतांश शेती जिरायती आहे. याव्यतिरिक्त चाळीसगाव तालुक्यामध्ये लिंबू उत्पादही मोठ्या प्रमाणात होतं. (chalisgaon maharashtra)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.