या विधानसभेत राज्यात महायुतीच्या (Mahayuti ) २०० पेक्षा जास्त जागा जिंकून येणार असल्याचा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. कापसाळ येथील माटे सभागृहात दापोली, गुहागर आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी घेतली. यावेळी दापोलीतील महायुतीचे उमेदवार आमदार योगेश कदम, गुहागर मधील राजेश बेंडल उपस्थित होते. यावेळी मंत्री चव्हाण म्हणाले की, जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत.
पुढे ते म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीत कुठेही मतभेद नसून गुहागर, दापोली आणि रत्नागिरीदेखील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकत्र आले आहेत. दापोली मतदारसंघात वाद नव्हताच, तो एक गैरसमज आहे. मात्र आता हा गैरसमज मिटला आहे. रत्नागिरीत बाळ मानें यांनी भाजपा सोडून विचारांशी गद्दारी केली आहे.” (Ravindra Chavan)
राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचाच आमदार
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सामंत यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ता मेळावा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात… pic.twitter.com/1kXFTSg1WY
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) November 7, 2024
दापोली तसेच गुहागरमध्ये महायुतीत कोणतेही मतभेद राहिलेले नाहीत. तेथील पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी सर्वांचे प्रयत्न असून, कोणतीही नाराजी नाही. माजी आमदार डॉ. विनय नातू हे देखील प्रचारात सक्रिय राहिले आहेत. रत्नागिरीत बाळ मानेंनी भाजपाला राम राम केला असला तरी तेथील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते महायुती सोबत राहिले आहेत. माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून विचारांशी गद्दारी केलेली आहे. त्यांना भाजपाची कदापी साथ मिळणार नाही. (Ravindra Chavan)
यावेळी उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले की, बारसू येथील संपादित ५ हजार एकर जागेत रिफायनरी येण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच प्रयत्न केले होते. आता तेच रिफायनरी होऊ नये यासाठी विरोध करीत आहेत. एकीकडे राजापुरातील स्थानिक आमदार रिफायनरीला समर्थन देतात, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत रिफायनरीला विरोध करतात, यात आमची भूमिका स्पष्ट आहे, जनतेचा विरोध स्वीकारून प्रकल्प लादला जाणार नाही. असे ही सामंत यांनी स्पष्ट केले. (Ravindra Chavan)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community