महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 

105
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 
महाराष्ट्रात PM Narendra Modi यांच्या प्रचारसभांचा धडाका, 6 दिवसांत 10 सभा घेणार 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील धुळ्यातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सहा दिवसांत दहा सभा घेणार आहेत. महाराष्ट्र भाजपाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींची (PM Narendra Modi) धुळ्यात ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सभा होणार आहे. यानंतर दुपारी 2 वाजता पंतप्रधान नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने मते मागताना (Campaign meetings) दिसतील.  (PM Narendra Modi)

पंतप्रधान मोदी ९ नोव्हेंबरला दोन सभा घेणार आहेत

दुसऱ्या दिवशी ९ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींची अकोल्यात जाहीर सभा होणार आहे. दुपारी 12 वाजता ही रॅली निघणार आहे. यानंतर ते नांदेड येथे दुपारी दोन वाजता जाहीर सभेला संबोधित करतील. यादरम्यान भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पीएम मोदींच्या रॅलीत सीएम एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) उपस्थित राहणार असल्याचे समजते. 

(हेही वाचा – मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; Ramesh Chennithala यांचा मित्रपक्षांना इशारा)

12 आणि 14 नोव्हेंबरला प्रत्येकी तीन रॅली काढणार आहेत

12 नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात तीन सभा घेणार आहेत. चिमूर आणि सोलापूरमध्ये ते जाहीर सभा घेणार आहेत, तर पुण्यात रोड शो (PM Narendra Modi Road Show) करणार आहेत. त्याचवेळी, 14 नोव्हेंबर रोजी पीएम मोदी संभाजी नगर, रायगड आणि मुंबईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.