लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी क्रेबिज विद्यापीठात भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे, असे सांगितले होते. मात्र भारताच्या संविधानाच्या सरनाम्यात राष्ट्र असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे राहुल गांधींनी संविधानाचा अभ्यास करावा, असा सल्ला माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी गांधींना (Rahul Gandhi) दिला आहे. पुण्यातील सजग रहो अभियानाच्या व्यासपीठावर ते बोलत होते.
(हेही वाचा – Assembly Election 2024 : आदिवासीबहुल गडचिरोलीत बाप-लेक लढत लक्षवेधी!)
धर्माधिकारी पुढे म्हणाले की, शेख हसीना यांना बांगलादेश सोडून पळून जावे लागले, हा भारतासाठी एक धडा असून पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशाची राज्यघटना इस्लामिक आहे. त्यात संविधानाचा आधार घेत काही राजकीय पक्ष मुस्लिमांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी करत आहेत. मात्र हे संविधान विरोधी असून हिंदूंनी गाफिल राहू नये. तसेच मुस्लिमांनी एकगठ्ठा मतदान केले तर ते सवैधानिक अधिकार आणि हिंदूंनी हिंदू म्हणून मतदान केले तर त्याला ढोंगीपणा म्हणायचे, अशा शब्दात धर्माधिकारी यांनी सुनावले. तसेच यावेळी राहुल गांधींनी संविधान शिकवले पाहिजे, असे खडेबोल ही धर्माधिकारी यांनी गांधींना (Rahul Gandhi) सुनावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community