- प्रतिनिधी
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील डान्सबारमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालच्या नावाखाली बांगलादेशी तरुणी आणि महिलांना आश्रय दिला जात होता. परंतु महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी घालण्यात आल्यानंतर मुंबईसह इतर महानगरात बांगलादेशी महिलांची संख्या कमी झाली होती. परंतु अजूनही ठाणे, नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात डान्सबार बेकायदेशीररित्या सुरु असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांगलादेशी तरुणी आणि महिलांची तस्करी करुन बेकायदेशीररित्या त्यांना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील डान्सबार तसेच लॉजमध्ये देहव्यवसायात लोटले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. (Crime)
(हेही वाचा – ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित २० ठिकाणी ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण?)
ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे एका हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना १४ महिला आढळून आल्या. या महिला बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांचे नागरिकत्त्व तपासले जात आहे. मागील महिन्यात डोंबिवली मानपाडा आणि नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिला आणि तरुणींना अटक करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे असणाऱ्या हॉटेल सफायर इन या ठिकाणी असलेल्या लॉजिंग बोर्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी महिला असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. खंडणी विरोधी पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल सफायर इन येथे छापा टाकला असता, पोलिसांना १४ तरुणी आणि महिला आढळून आल्या आहेत. या महिला आणि तरुणींचा वापर हॉटेल व्यावसायिक देहव्यवसायासाठी करीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : आदिवासीबहुल गडचिरोलीत बाप-लेक लढत लक्षवेधी!)
ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि तरुणी बांगलादेशी नागरिक असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिसांकडून त्यांच्याकडे असणारी कागदपत्रे तपासले जात आहे. पोलिसांना संशय आहे की ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि तरुणी या बांगलादेशी नागरिक असून त्यांना भारतात आणणारी एक टोळी शहरात तैनात आहे. ही टोळी बांगलादेशातील मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या संपर्कात असून तेथून मागणीनुसार तरुणींना आणि महिलांना भारतात आणून त्यांना देहव्यवसायात लोटणे हे या तस्करांचे काम आहे. या महिलांना हॉटेल डान्सबार, कुंटणखाना येथे देहव्यवसायासाठी विकले जाते. या महिलांना तस्कर विना कागदपत्रे चोरट्या मार्गाने भारतात आणून त्यांची बनावाट कागदपत्रे बनवून त्यांना डान्सबार तसेच कुंटणखाना येथे विकले जाते अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. उल्हासनगर पोलिस ठाण्यात हॉटेल सफायर इनचे मॅनेजर, वेटर्स आणि ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community