मुंबईत Raj Thackeray यांचं भावनिक आवाहन; म्हणाले …तर दुकान बंद करणार!

238
हिंदुत्वाला तडा देण्याचे काम शरद पवारांनी केले; शेवटच्या सभेत Raj Thackeray बरसले

राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, मनसैनिकांनी आतापर्यंत मेहनत घेऊन अनेक आंदोलने केली. सत्तेत नसतांनादेखील आम्ही कामे केली. दुकानावरच्या पाट्यांसाठी आंदोलन केले, तेव्हा प्रत्येक पाट्यांवर मराठी नाव आले. मोबाईल फोनवर फक्त हिंदी आणि इंग्रजी येत होते, पण दणका दिल्यानंतर मराठी कानावर ऐकू यायला लागले, सत्तेत नसताना मनसेने रिझल्ट दिले आहेत. (Raj Thackeray)

मशिदीसमोरच्या भोंग्याचा त्रास अनेकांना होत होता, उद्धव ठाकरेंचे सरकार होते, तीन वेगवेगळ्या प्राण्यांचे सरकार होते. महाराष्ट्रभर आंदोलन केले, अनेकांनी स्वतःहून बंद केले. माझ्या १७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या गेल्या. एका मुस्लीम पत्रकाराने सांगितले तुम्ही भोंगे बंद केले म्हणून माझा लहान मुलगा आज शांत झोपतोय. कोणत्याही धर्माचा दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्रास होता कामा नये.

येत्या दोन दिवसात मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार

राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले की, पुढच्या २ दिवसांत मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यात एक गोष्ट प्रामुख्याने आहे, ती म्हणजे राज्यातील एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही. रस्त्यांवरील नमाज पठणही बंद करणार. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे लोकांची लक्षात ठेवण्याची ताकद कमी झाली आहे. पण, मनसेने ज्या गोष्टी केल्यात त्या कायमस्वरूपी आहेत. रेल्वे भरतीसाठी मनसेने आंदोलन (MNS agitation) केले, कारण इथल्या नोकऱ्या बाहेरच्या राज्यातील तरूणांना दिल्या जात होत्या. या परिक्षांची इथे जाहिरात दिली जात नव्हती, याला जबाबदार कोण? इथून दिल्लीत जाणाऱ्या खासदार मंत्र्यानी काय केलं? यावर संसदेत कुणी का बोललं नाही? जर हे नेते महाराष्ट्राच्या उपयोगीच पडणार नसतील तर तुम्ही त्यांना का निवडून द्यायचं? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्या कृत्याने डॉ. आंबेडकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील : किरण रिजिजू)

दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly 2024) माझे ज्या मतदारसंघात उमेदवार असतील तेथे जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावं. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्व मशिदीवरचे भोंगे (Bhonga on the mosque) पहिल्या पहिल्या ४८ तासांत खाली उतरवले ना? तर परत राजकारण सांगणार नाही. जर त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर हे आमच्या खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना आदेश देईल आणि ते रजा अकादमीचा (Raza Academy) बदला घेऊन टाकतील”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.