Praja Foundation : मागील दहा वर्षांत बदलत्या जीवन शैलीमुळेच सर्वाधिक मृत्यू; मधुमेह, रक्तदाब, टीबी आणि श्वसनाचे आजार ठरतात कारण !

Praja Foundation : प्रजाचा आरोग्य अहवाल प्रकाशित 

441
Praja Foundation : मागील दहा वर्षांत बदलत्या जीवन शैलीमुळेच सर्वाधिक मृत्यू; मधुमेह, रक्तदाब, टीबी आणि श्वसनाचे आजार ठरतात कारण !
Praja Foundation : मागील दहा वर्षांत बदलत्या जीवन शैलीमुळेच सर्वाधिक मृत्यू; मधुमेह, रक्तदाब, टीबी आणि श्वसनाचे आजार ठरतात कारण !

मागील दहा वर्षांत बदलत्या जीवनशैली मुळे मृत्यू चे प्रमाण वाढत चालले असून जीवनशैलीशी निगडित मधुमेहासारख्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली आहे. सन २०१४ मध्ये २४२८ एवढी होती, जी २०२२ पर्यंत १४२०७ झाली. त्यामुळे; मृत्यूसंख्येत ४८५ टक्क्यांनी वाढ झाली असून आता मृत्यूच्या कारणांमध्ये मधुमेह सर्वात वरचे आहे. मधुमेह, श्वसनाचे गंभीर आजार, टीबी आणि उच्च रक्तदाब हेच आजार मृत्यूची प्रमुख  कारणे ठरत असल्याचे  प्रजा फाउंडेशनच्या आरोग्य अहवालातून समोर आले आहे. (Praja Foundation)

प्रजा फाऊंडेशनने ‘मुंबईतील आरोग्य समस्यांची स्थिती 2024’ हा अहवाल आज प्रकाशित केला. मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवा, मुख्य आजारांचा प्रादुर्भाव, श्वसनाचे आजार आणि तैनात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या यांची सद्यस्थिती  यावर हा आधारित हा आरोग्य अहवाल आहे. या अहवालात  महापालिकेने मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईचे स्थान उंचावण्यासाठी खुल्या जागांचा विस्तारण्याला आणि आरोग्य सेवा सक्षम करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे असे नमूद केले आहे. नागरिकांचे आरोग्य व जीवनशैली सुधारण्यासाठी केलेल्या अशा बदलांमुळे जीवनशैली-निगडित आजारांचे आव्हान आटोक्यात यायलाही मदत होईल”, असे या अहवालात म्हटले आहे. (Praja Foundation)
आजाराचे हे प्रमाण आटोक्यात आणणे जरूरीचे आहे आणि त्यासाठी शहरी नियोजन आणि विकासाच्या संदर्भात भारत सरकारच्या ‘गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA)’ चे ‘शहरी आणि प्रादेशिक विकास योजना आखणी आणि अंमलबजावणी (Urban and Regional Development Plans Formulation and Implementation – URDPFI) दिशानिर्देश महत्त्वाचे असून त्यांचे पालन होणे गरजेचे आहे. “व्यक्तीचे आरोग्य, स्वास्थ्य आणि शारीरिक हालचालींकरिता दरडोई किमान 10 चौरसमीटर खुली जागा उपलब्ध असली पाहिजे अशी त्यातील एक शिफारस आहे. मात्र मुंबई विकास आराखडा (2014-2034) मध्ये दरडोई केवळ 3 चौमी खुली जागा प्रस्तावित केली आहे. मुंबईत दर व्यक्तीमागे उपलब्ध खुली जागा वाढवण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्याची गरज यावरून अधोरेखित होते, तसेच नागरिकांचे आरोग्य व स्वास्थ्य जपण्यासाठी उपलब्ध पायाभूत सेवासुविधां पुरेशा नसून त्या विस्तारण्याची गरजही लक्षात येते”, असे फाऊंडेशनचे सीईओ मिलिंद म्हस्के यांनी म्हटले. (Praja Foundation)
मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत चालली आहे. २०१९ ते २०२२ या कालावधीत शहरातील सरासरी हवेच्या गुणवत्तेची घसरण ‘समाधानकारक’ (51-100 – हवा गुणवत्ता निर्देशांक AQI) वरून ‘मध्यम’ (101-200 – हवा गुणवत्ता निर्देशांक AQI) वर झालेली आहे,अशी माहिती प्रजाच्या क्षमता विकास विभागाचे सहयोगी व्यवस्थापक एकनाथ पवार यांनी दिली. “याच कालावधीत ‘श्वसनाचे गंभीर आजारां’मुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ३३,७११  आहे, तर आणखी १६३४५  जणांचे मृत्यू टीबीमुळे झालेले आहेत. हवा प्रदूषणाचा जबरी फटका नागरिकांना बसतो आहे, हे या आकड्यांवरून लक्षात येते. २०२३ मध्ये ही हवेची गुणवत्ता आणखी घसरल्याचे दिसते, कारण पूर्ण वर्षभरात हवेची गुणवत्ता ‘चांगली’ (०-५० AQI) आहे असे एकाही महिन्यात घडले नाही” असे त्यांनी म्हटले. (Praja Foundation)
“मुंबईत, URDPFI दिशानिर्देशांच्या तुलनेत, ५२५ दवाखाने कमी आहेत. शहरात सध्या महापालिकेचे १९१ दवाखाने अस्तित्वात आहेत, परंतु यातील ९५ टक्के दवाखाने (१८१) दिवसाचे केवळ ७ तास चालू असतात”, अशी माहिती प्रजाच्या संशोधन विभागाचे सहयोगी व्यवस्थापक श्रेयस चोरगी यांनी दिली. “२०२२ पासून वाढवत महापालिकेने २०७ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे क्लिनिक सुरू केली. आरोग्य सेवा विस्तारण्यासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह होते. परंतु २०७ पैकी ९७ क्लिनिक आधीच्याच महापालिका दवाखान्यांमध्ये चालवली जातात आणि केवळ ६ टक्केच (२०७ पैकी १३) दवाखाने चौदा तास सेवा देतात (सकाळी ७ ते रात्री १०).आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व महापालिका दवाखाने २४ तास चालू असले पाहिजेत, विशेषत: झोपडपट्टीबहुल प्रभागांमध्ये जिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे तिथे, कारण तिथे दवाखान्यांची गरज सर्वाधिक आहे,” असे त्यांनी म्हटले. (Praja Foundation)
 “गेल्या तीन वर्षांपासून महापालिका निवडणुका प्रलंबित असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत महापालिकेचा कारभार चालू आहे. त्यामुळे सक्रीय आरोग्य समिती गठित झालेली नाही” याकडे मिलिंद म्हस्के यांनी लक्ष वेधले आणि काही मुद्दे अधोरेखित केले. (Praja Foundation)
“मुंबईतील आरोग्याची सद्यस्थिती सुधारण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्याला प्राधान्य द्यायला हवे आणि यासाठी नागरिकांनी पुढाकार व सहभाग घ्यायला हवा. आरोग्यासंबंधी, तसेच मृत्यू व आजारासंबंधी, डेटा तत्काळ (रियल-टाईम) संकलित होण्यासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य व्यवस्थापन माहिती यंत्रणा’ (National Health Management Information System – NHMIS) पूर्णत: कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचेही म्हस्के म्हणाले. (Praja Foundation)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.