Assembly Election 2024 : चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार, वडेट्टीवार आणि धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला!

41
Assembly Election 2024 : चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार, वडेट्टीवार आणि धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला!
Assembly Election 2024 : चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार, वडेट्टीवार आणि धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला!

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघाने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला असला तरी गेल्या दहा वर्षात चंद्रपूर जिल्हा आणि सुधीर मुनगंटीवार हे एक वेगळे समीकरण तयार झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात त्यातील एका मतदार संघाचे म्हणजेच बल्लारपूरचे प्रतिनिधित्व मुनगंटीवार करतात. तर काँग्रेस आमदार आणि राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा ब्रह्मपुरी मतदार संघदेखील याच जिल्ह्यात येत आहे असून पक्षांतर्गत वाद असले तरी त्यांची मतदार संघावर घट्ट पकड आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा- Assembly Elections : पालघर जिल्ह्यातील मतदारसंघात कोण मारणार बाजी?)

 मुनगंटीवार यांची ‘सप्तपदी’

६२ वर्षीय सुधीर मुनगंटीवार यांचा लोकसभा निवडणुकीत तीन वेळा १९८९, १९९१ आणि २०२४ मध्ये पराभव झाला असला तरी यांनी विधानसभेत १९९५ पासून तब्बल सलग सहा वेळा ३०,००० पेक्षा अधिक मताधिक्य घेत विजयाची ‘डबल हॅट्रिक’ साधली आणि सातव्यांदा विजयरथ खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी लोकसभेत त्यांचा पराभव झाला असला तरी बल्लारपूरची जनता त्यांना विधानसभेत पाठवण्यास अधिक इच्छुक असल्याचे दिसून येते. अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात ‘शेतकरी सन्मान योजना’ लागू करून शेतकऱ्यांचे सुमारे ३४,००० कोटी रुपये कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला, तर वनमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ५० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट पार करत उपक्रमाला ‘ लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले. याशिवाय मतदार संघातील त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर असल्याने सातव्यांदा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर असल्याची चर्चा आहे. बल्लारपूरमधून मुनगंटीवार त्यांच्यासमोर काँग्रेसचे संतोषसिंह रावत असून उबाठाचे अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी केल्याने मुनगंटीवार यांच्यासाठी लढत सोपी झाली, असे चित्र आहे. (Assembly Election 2024)

वडेट्टीवार यांची हॅट्रिक होणार?

ब्रह्मपुरी मतदार संघात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यासमोर भाजपाचे कृष्णा सहारे निवडणूक रिंगणात असले तरी वडेट्टीवार यांची भिस्त तेली समाजावर असून समाजाने त्यांना २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाच्या मोदी लाटेतही तारले. आता ते विजयाची हॅट्रिक करतात का? याकडे समाजाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा- Assembly Election 2024 : वेगवेगळे मतदान कार्ड असतील तर होऊ शकतो कारावास)

धानोरकरांचा भाऊ की दीर?

वरोरा मतदार संघाचे राजकारण धानोरकर विरुद्ध विजय वडेट्टीवार यांच्यात फिरत आहे. काँग्रेसच्या २०१९ ला निवडून आलेल्या तत्कालीन खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) निवडून आल्या. सहा महिन्यापूर्वी त्यांना पक्षाने लोकसभा निवडणूकीचे तिकीट दिले आणि त्या जिंकल्या. खासदार होताच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. तर बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून याच मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय मतदार संघात शिवसेना उबाठाचे बंडखोर मुकेश जीवतोडे हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत. भाजपाकडूनही या मतदार संघात रमेश राजुरकर यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी माघार घेतली भाजपाचे अधिकृत उमेदवार करण संजय देवतळे यांचा मार्ग मोकळा झाला.  (Assembly Election 2024)

९५ उमेदवार रिंगणात

उर्वरित मतदार संघांपैकी राजुरा मतदार संघात काँग्रेसचे सुभाष धोटे आणि भाजपाचे देवराव भोंगळे, चंद्रपूरमध्ये भाजपाचे किशोर जोरगेवार आणि काँग्रेसचे प्रवीण पडवेकर तर चिमूरमधून भाजपाचे कीर्तिकुमार भांगडिया आणि काँग्रेसचे सतीश वारजूकर आमनेसामने आहेत. या जिल्ह्यात एकूण १२० पैकी २५ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ९५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून महायुतीला सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र आहे. (Assembly Election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.