Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत अर्शदीप, हार्दिक यांना विक्रमाची संधी 

95
Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत अर्शदीप, हार्दिक यांना विक्रमाची संधी 
Ind vs SA, 1st T20 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत अर्शदीप, हार्दिक यांना विक्रमाची संधी 
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानचा पहिला टी-२० सामना दरबनमध्ये शुक्रवारी रंगेल. भारताच्या युवा खेळाडूंना आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी ही एक चांगली संधी असेल आपली चमक दाखवून देण्याची. शिवाय भारताच्या टी-२० संघात सध्या चांगली चुरस आहे. त्यामुळे आपली जागा भक्कम करण्याचीही ही एक संधी असेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा युवा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघातील दोन गोलंदाज अर्शदीप आणि हार्दिक पांड्या एकाच विक्रमाला गवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. (Ind vs SA, 1st T20)

(हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2024 : आज राजकीय नेत्यांच्या सभांमुळे राज्यभर धुराळा उडणार; जाणून घ्या कोणाची कुठे आहे सभा …)

अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजाने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५६ सामन्यांत ८७ बळी मिळवले आहेत. यासाठी त्याने षटकामागे ८.०८ च्या गतीने धावा दिल्या आहेत. आणखी ९ बळी मिळवल्यावर तो टी-२० मधील भारताचा सगळ्यात यशस्वी गोलंदाज ठरू शकेल. सध्या यजुवेंद्र चहल ९६ बळींसह या यादीत पहिला आहे. चहलने ८० सामन्यांमध्ये ९६ बळी मिळवले आहेत. (Ind vs SA, 1st T20)

विशेष म्हणजे भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १०५ सामन्यांत ८७ बळी मिळवले आहेत. त्यामुळे या विक्रमाचा तो ही दावेदार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघ ४ टी-२० सामने खेळणार आहे. अर्शदीप व हार्दिकला या विक्रमाबरोबरच भारताकडून सगळ्यात आधी बळींचं शतक पूर्ण करण्याची संधी आहे. (Ind vs SA, 1st T20)

(हेही वाचा- ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मी भाजपासोबत गेलो; Chhagan Bhujbal यांच्या वक्तव्याने खळबळ)

न्यूझीलंडचा टीम साऊदी हा १२६ सामन्यांमध्ये १६४ बळी मिळवत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तानचा राशीद अली १५२ बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. (Ind vs SA, 1st T20)

भारतीय टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार व्यक्ष, आवेश खान व यश दयाल  (Ind vs SA, 1st T20)

(हेही वाचा- Salman Khan: बिश्नोई टोळीकडून सलमान खानला पुन्हा धमकी!)

  • दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम 

८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना (दरबान)

१० नोव्हेंबर – दुसरा टी-२० सामना (गेबेरा)

१३ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना (सेंच्युरियन)

१५ नोव्हेंबर – चौथा टी-२० सामना (जोहानसबर्ग) 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.