राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आरोपांचे खंडण आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं आहे. मी लोकसत्ता अशी कोणतीच मुलाखत दिलेली नाही. तसेच ईडीपासून सुटका करण्यापासून आम्ही सर्व भाजपसोबत गेले, असा आरोप गेल्या अनेक दिवासांपासून आमच्यावर होतोच आहे. मला महाराष्ट्र सदन प्रकरणातून देखील न्यायालयाने क्लिनचीट दिली आहे, अशी आठवण छगन भुजबळ यांनी करुन दिली. तसेच वकिलांसोबत बोलून या प्रकरणाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं छगन भुजबळांनी सांगितले.
(हेही वाचा-Salman Khan: बिश्नोई टोळीकडून सलमान खानला पुन्हा धमकी!)
आरोपांचे खंडण करताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) पुढे म्हणाले, “आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. माझ्या मतदारसंघात 2 हजार कोटींची कामे सुरु आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्याने आम्हाला विकास करण्यासाठी फायदा झाला. हे आताच का छापलं गेलं, हे मला कळलेलं नाही. मी अजून पुस्तक वाचलेलं नाहीय, यामध्ये काय लिहिलंय-काय नाही, हे बघेन आणि माझ्या वकिलांसोबत बोलेन.”
“पुस्तकात नको-नको त्या गोष्टी लिहिल्या आहेत. यामगे नेमका काय हेतू आहे, याबाबत मला कल्पना नाही. सध्या मी खूप व्यस्त आहे. त्यामुळे मी निवडणुकीनंतर माझ्या वकिलांशी बोलून यावर निर्णय घेईन.” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community