Maharashtra Vidhan Sabha Election: “मविआच्या गाडीला ना ड्रायव्हर ना चाक”, ​​​​​​​धुळ्यातील सभेतून PM Modi यांचा हल्लाबोल

37
Maharashtra Vidhan Sabha Election:
Maharashtra Vidhan Sabha Election: "मविआच्या गाडीला ना ड्रायव्हर ना चाक", ​​​​​​​धुळ्यातील सभेतून PM Modi यांचा हल्लाबोल

धुळ्यात पंतप्रधान मोदींची (PM Modi) पहिलीच प्रचारसभा (Maharashtra Vidhan Sabha Election) होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळ्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ग्रामदैवत एकविरा देवीला नमन करीत राम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी मविआवर निशाणा साधला. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळाली. जनतेला लुटणारे महाविकास आघाडीसारखे (MVA) लोक सत्तेत आले तर ते विकास थांबवून ठेवतात, अशी टीका मोदींनी केली आहे.

(हेही वाचा-राजदीप सरदेसाई खोटारडे; Chhagan Bhujbal यांनी केले आरोपांचे खंडण)

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, “मी महाराष्ट्राला जे्हा केव्हा काही मागितले, तेव्हा मला येथील जनतेने अगदी मोकळ्या मनाने मला ते दिले. या निवडणुकीतही ते आम्हाला साथ देतील असा मला विश्वास आहे. मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबू देणार नाही. पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार. महाराष्ट्राला हवे असणारे सुशासन केवळ महायुतीचेच सरकार देऊ शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आहे आणि ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न ऐकू येत आहेत.” (Maharashtra Vidhan Sabha Election)

(हेही वाचा-शरद पवार हे फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)

“राजकारणात (Maharashtra Vidhan Sabha Election) आल्यानंतर प्रत्येकाचे एक लक्ष्य असते. आमच्यासारखे लोक जनतेला ईश्वराचे रूप मानतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलोत. याऊलट काही लोकांच्या राजकारणाचा आधार हा लोकांना लुटण्याचा आहे. हे लोक सरकारमध्ये आले की, ते विकास ठप्प करतात. ते प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीचे धोक्यातून बनलेल्या सरकारचे अडीच वर्षे पाहिले. या लोकांनी प्रथम सरकारची लुट केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लूट केली. त्यांनी मेट्रो प्रकल्प ठप्प केले. वाढवण बंदरांच्या कामात अडथळे निर्माण केली. समृद्धी महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण केले.” (PM Modi)

“मविआच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रत्येक प्रकल्प ठप्प केला. या प्रकल्पांमुळे येथील जनतेचे भविष्य उज्ज्वल होणार होते. ही स्थिती तेव्हा बदलली, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने येथे महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाचे नवे विक्रम रचले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांत महाराष्ट्राला त्याचा गौरव परत मिळाला आहे. विकासाचा भरवसा परत मिळाला आहे. त्यामुळे येथील मतदारांनी भाजप महायुती आहे, तरच गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे हे लक्षात घ्यावे.” असं पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सांगितले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.