-
ऋजुता लुकतुके
जगभरात आपल्या क्रीडाविषयक भविष्यांसाठी प्रसिद्ध असलेले ज्योतिषी ग्रीनस्टोन लोबो यांनी विराट कोहलीसाठी आगामी ३ वर्षांसाठी खूपच चांगलं भविष्य वर्तवलं आहे. विराट किमान २०२७ पर्यंत खेळेल. या कालावधीत त्याची कामगिरीही चांगली असेल, असं लोबो यांनी म्हटलं आहे. स्टारप्ले – क्रिकेट व भविष्य या कार्यक्रमात लोबो यांनी हे भाकीत केलं आहे. आगामी बोर्डर – गावसकर मालिकेत विराट कोहली बॅटने चमकेल, असंही त्यांनी या कार्यक्रमात म्हटलं आहे. (Virat Kohli)
(हेही वाचा- राजदीप सरदेसाई खोटारडे; Chhagan Bhujbal यांनी केले आरोपांचे खंडण)
युरेनस आणि नेपच्युन हे दोन ग्रह विराटच्या पाठीशी आहेत, असं लोबो यांचं म्हणणं आहे. ‘मला एक प्रश्न कायम लोक विचारतात की, विराट कधीपर्यंत खेळेल? त्यावर माझं उत्तर असं आहे की, किमान २०२७ पर्यंत तो खेळेल. या कालावधीत त्याची बॅटही तळपेल. त्याचा नेपच्युन हा ग्रह महत्त्वाचा आहे. तो सध्या त्याच्या पाठीशी आहे,’ असं लोबो यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे. (Virat Kohli)
विराट कोहलीच्या नावावर ५० एकदिवसीय शतकं आहेत. पण, कसोटीत तो सध्या काहीसा चाचपडतोय. त्याची २९ शतकं आणि ९,०४० धावा झाल्या आहेत. कसोटीत तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकू शकेल का हा प्रश्न आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ५१ कसोटी शतकं आणि १५,००० धावा आहेत. सध्या विराटसाठी हा डोंगर चढणं कठीण आहे. पण, ते शक्य आहे का यावर लोबो म्हणतात, ‘सचिनचा विक्रम विराट मोडेल की नाही हे आताच सांगता येणार नाही. कारण, आता १५,००० धावा हा खूप मोठा पल्ला आहे. पण, तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल आणि सुनील गावसकर आणि राहुल द्रविड यांना नक्की मागे टाकेल,’ असं लोबो याविषयी बोलताना म्हणाले. (Virat Kohli)
(हेही वाचा- शरद पवार हे फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे मालक; Devendra Fadnavis यांचा हल्लाबोल)
दरम्यान विराट कोहलीने अलीकडेच आपली प्रसिद्धी संस्थाही बदलली आहे. त्याविषयीची बातमी त्याने सोशल मीडियावरून चाहत्यांना नुकतीच दिली. (Virat Kohli)
🤝 #sportingbeyond pic.twitter.com/Z1kojD8lzJ
— Virat Kohli (@imVkohli) November 7, 2024
स्पोर्टिंग बियाँड्स ही कंपनी आता विराट कोहलीचा पीआर सांभाळणार आहे. विराट कोहली यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत खेळला नव्हता. आपल्या मुलाच्या जन्मासाठी तो पत्नी आणि कुटुंबाबरोबर लंडनला होता. त्यानंतर आयपीएलमध्ये त्याने ७६५ धावा करत एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. आणि जून महिन्यात भारतीय संघाला टी-२० विश्वचषकही जिंकून दिला. (Virat Kohli)
त्यानंतर मात्र बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये विराटची फलंदाजी चाललेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध सहा डावांमध्ये मिळून तो शंभर धावाही करू शकलेला नाही. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community