PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार

163
PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार
PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार

धुळ्यात पंतप्रधान मोदींची (PM Modi) पहिलीच प्रचारसभा (Maharashtra Vidhan Sabha Election) होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळ्यातील सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी ग्रामदैवत एकविरा देवीला नमन करीत राम राम म्हणत मराठीतून भाषणाला सुरुवात केली. तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील वाढवण बंदराबाबत मोदींनी महत्त्वाची घोषणा केली.

“विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ”
वाढवण बंदराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, “इलेक्ट्रॉनिक वाहन परियोजना, स्टील प्रोजेक्ट, ग्रीन प्रोजेक्ट असे राज्यातील वेगवेगळ्या भागात स्थापित केले जात आहे. महाराष्ट्रात वाढवण बंदर देखील होत आहे. मूलभूत सुविधा मुळे रोजगाराच्या नवीन संधी मिळत आहेत. वाढवण बंदरासाठी मी आलो होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, एवढे सर्व करत आहात तर तिथे एक विमानतळ देखील द्या. मी आज देवेंद्र फडणवीसांना सांगतो, जेव्हा राज्यात महायुतीचे (MahaYuti) सरकार येईल, आचारसंहिता संपेल, तेव्हा वाढवण येथील विमानतळाबाबत देखील निर्णय घेऊ.” असा आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले. (PM Modi)

“विकसित महाराष्ट्र महायुतीचा वचनमनामा”
“विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचा आधार महायुतीचा वचनमनामा बनेल. मागील 10 वर्षात महिलांना केंद्रित अनेक योजना आणल्या. मागील सरकारने महिलांचा रस्ता अडवला होता. आम्ही सर्व अडथळे दूर केले, सर्व दरवाजे खोलले. महिलांना आरक्षण दिले, शौचालय ते गॅस सिलेंडर आशा प्रत्येक ठिकाणी महिला केंद्रस्थानी आहेत. महायुती सरकारने आईचे नाव अनिवार्य केले आहे. सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले. महिलांचे सामर्थ्य वाढत आहेत. मुलींना रोजगार मिळणार, महिला सशक्तीकरणसाठी आमचे सरकार पावले उचलत आहेत ते आमच्या विरोधकांना सहन होत नाहीय. माझी लाडकी बहिण योजनांची देशभरात चर्चा आहे. काँग्रेसचे लोक योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. त्यांना सत्ता मिळाली तर ही योजना बंद करतील.” (PM Modi)

“जनतेच्या सेवेसाठी राजकारणात”
“राजकारणात (Maharashtra Vidhan Sabha Election) आल्यानंतर प्रत्येकाचे एक लक्ष्य असते. आमच्यासारखे लोक जनतेला ईश्वराचे रूप मानतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलोत. याऊलट काही लोकांच्या राजकारणाचा आधार हा लोकांना लुटण्याचा आहे. हे लोक सरकारमध्ये आले की, ते विकास ठप्प करतात. ते प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीचे धोक्यातून बनलेल्या सरकारचे अडीच वर्षे पाहिले. या लोकांनी प्रथम सरकारची लुट केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लूट केली. त्यांनी मेट्रो प्रकल्प ठप्प केले. वाढवण बंदरांच्या कामात अडथळे निर्माण केली. समृद्धी महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण केले.” (PM Modi)

“मविआच्या लोकांनी विकासाचा प्रकल्प ठप्प केला”
“मविआच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रत्येक प्रकल्प ठप्प केला. या प्रकल्पांमुळे येथील जनतेचे भविष्य उज्ज्वल होणार होते. ही स्थिती तेव्हा बदलली, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने येथे महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाचे नवे विक्रम रचले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांत महाराष्ट्राला त्याचा गौरव परत मिळाला आहे. विकासाचा भरवसा परत मिळाला आहे. त्यामुळे येथील मतदारांनी भाजप महायुती आहे, तरच गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे हे लक्षात घ्यावे.” असं पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सांगितले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.