100 Years of Indian Hockey : भारतीय हॉकी झाली १०० वर्षांची

100 Years of Indian Hockey : हॉकी इंडियाने वर्षभरासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. 

54
100 Years of Indian Hockey : भारतीय हॉकी झाली १०० वर्षांची
  • ऋजुता लुकतुके

७ नोव्हेंबर १९२५ मध्ये भारतीय हॉकी संघटनेची स्थापना झाली होती आणि तेव्हापासून भारतीय हॉकीला जागतिक स्तरावर अधिकृत मान्यता मिळाली. आता या गोष्टीला ९९ वर्षं पूर्ण झाली आहेत आणि ८ नोव्हेंबर २०२४ पासून भारतीय हॉकीचं शतक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. या मधल्या ९९ वर्षांचा हॉकीचा इतिहास हा नक्कीच गौरवशाली आहे. कारण, या कालावधीत भारतीय राष्ट्रीय हॉकी संघाने ८ ऑलिम्पिक सुवर्ण पदकं जिंकली आणि यात सलग सहा सुवर्ण जिंकण्याचा विक्रमही केला. (100 Years of Indian Hockey)

(हेही वाचा – Ind vs Ban, Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील कानपूर खेळपट्टी ‘असमाधानकारक’)

१९८० मध्ये भारताने आपलं शेवटचं ऑलिम्पिक सुवर्ण जिंकलं. पण, त्यानंतर आलेला पदकांचा दुष्काळ भारताच्या ताज्या दमाच्या हॉकी संघाने मागच्या दोन ऑलिम्पिकमध्ये घालवला आहे. आधी टोकयो आणि आता पॅरिसमध्ये भारताने हॉकीत दोन कांस्य पदकं जिंकली आहेत. या चांगल्या कामगिरीवर स्वार होऊन हॉकी इंडियाने हॉकीच्या शतक महोत्सवी वर्षासाठी कार्यक्रमांची योजना केली आहे. सात वर्षांनंतर हॉकी इंडियाने इंडिया हॉकी लीग सुरू करण्याचं ठरवलं आहे. पुरुषांबरोबरच यंदा पहिल्यांदाच महिलांची लीगही सुरू होणार आहे. (100 Years of Indian Hockey)

(हेही वाचा – PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार)

‘भारतीय हॉकीचा शतक महोत्सव लक्षात घेऊनच वर्षभर आम्ही विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांची आखणी केली आहे. हॉकी इंडिया लीगचं पुनरुज्जीवन हा याचाच भाग आहे. भारतीय हॉकीची वैभवशाली परंपरा आणि पुढील वाटचाल यासाठी संस्मरणीय ठरेल असे कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येतील,’ असं हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तर्की यांनी म्हटलं आहे. भारतीय हॉकीचा येणारा काळ हा लिंगसमानतेचा असेल. त्यामुळे महिला व पुरुषांना समान वेतन तसंच सरावाच्या आणि प्रशिक्षणाच्या समान संधी देण्याचा प्रयत्न येत्या काळात हॉकी इंडिया करणार आहे. तसंच खेळाडूंसाठी नोंदणीची पद्धत आता ऑनलाईन करण्यात येणार आहे. (100 Years of Indian Hockey)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.