- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकाचं रुतलेलं गाडं आता पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मीडियाच्या अहवालांनुसार, पाकिस्तान क्रिकेट मंडळ हायब्रीड मॉडेलसाठी तयार झालं आहे आणि इतर देशांचे सामने पाकिस्तानमध्ये आणि भारताचे सामने हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ बाद फेरीत पोहोचला तर ते सामने कुठे होणार यावर अजून स्पष्टता नाही. स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Ind vs Ban, Test Series : बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतील कानपूर खेळपट्टी ‘असमाधानकारक’)
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण, भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्याला नकार दिल्यामुळे ही स्पर्धा गाजते आहे. त्यावर आता तोडगा निघाल्याचं दिसत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनंही या आशयाची बातमी दिली आहे. ‘भारतीय संघाला केंद्र सरकारकडून पाकिस्तानला येण्याची परवानगी मिळाली नाही तर वेळापत्रकात थोडीफार सुधारणा करून तो प्रश्न हाताळता येईल. भारताचे सामने युएईमध्ये शारजा किंवा दुबईत हलवता येतील,’ असं पाक बोर्डातील सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – PM Modi आचारसंहिता संपताच देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ इच्छा पूर्ण करणार)
बीसीसीआयने या प्रकरणी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं आहे. कारण, भारतात कुणालाही पाकिस्तानला प्रवास करायचा झाला तर केंद्र सरकारची परवानगी लागते आणि आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्र सरकारची परवानही नसेल तर आयसीसी कुठल्याही संघाला त्या देशाचा दौरा करण्यासाठी बळजबरी करू शकत नाही. त्यामुळे हा मुद्दा मागचे काही महिने जैसे थे होता. पण, आता गोष्टी पुढे सरकल्या आहेत. आणि ११ नोव्हेंबरला स्पर्धेचं नवीन वेळापत्रकही प्रसिद्ध होऊ शकतं. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा बहुप्रतिक्षित सामना सध्याच्या वेळापत्रकानुसार १ मार्चला लाहोरला प्रस्तावित होता. आता हा सामना दुबईला होऊ शकतो. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community