Amit Shah म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा महाराष्ट्रात आणायचे…’

शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणानंतर सांगितले की, मी नंतर जाईल. पण ते अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. ते का गेले नाहीत? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने विचारावा, असे अमित शाह म्हणाले.

143
राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरत आहे. महायुतीच्या बाजूने वातावरण निर्मिती होत असल्याचे दिसत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रचार सभेला सुरुवात झाली आहे. सांगली शिराळा येथे अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, अशी विचारणा मविआचे नेते करत होते. मात्र एकनाथ शिंदे हेच मविआचे मुख्यमंत्री आहेत, असे शिंदे गटाचे नेते म्हणत होते. मात्र आता अमित शाह यांनी प्रचारसभेत जे विधान केले आहे, त्यावरून या मुद्यावरून चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला शिराळा येथे समर्थ रामदास स्वामींना अभिवादन केले. तसेच २० नोव्हेंबर रोजी डबल इंजिनचे सरकार आणण्यासाठी महायुतीला मतदान करण्याची भूमिका घ्या, असे सांगत मी लोकसभेलाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. जनतेची एकच भावना आहे की, आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचे आहे, असे विधान अमित शाह यांनी केले.

उद्धव ठाकरे आणि शरद ठाकरेंना आव्हान 

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हायला हवे की नको? जे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवून घेतात, ते उद्धव ठाकरेही या नामकरणाला विरोध करत आहेत. मी शरद पवारांना आज आव्हान देतो, तुम्ही कितीही जोर लावा पण संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगरच राहणार. तसेच तुमच्या चार पिढ्या आल्या तरी कलम ३७० काश्मीरमध्ये पुन्हा आणू शकत नाहीत. शरद पवार यांनी राम मंदिर निर्माणानंतर सांगितले की, मी नंतर जाईल. पण ते अद्याप दर्शनाला गेले नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेही गेले नाहीत. ते का गेले नाहीत? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेने विचारावा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.